Beed News : भाजपच्या जिल्हाध्यक्षांचं तळ्यात- मळ्यात; एका बॅनरवर जरांगे तर दुसऱ्यावर पंकजा मुंडे

Political News : मराठवाड्यात भाजपविरुद्ध मनोज जरांगे पाटील असा संघर्ष पाहायला मिळत असताना भाजपच्या जिल्हाध्यक्षाने एकाचवेळी दोन भूमिका मांडल्यामुळे बीडमध्ये हा चर्चेचा विषय झाला आहे.
beed News
beed News Sarkarnama
Published on
Updated on

Beed News : आगामी काळात राज्यात विधानसभा निवडणुका होत आहेत, त्याची सर्वच पक्षाकडून जोरदार तयारी सुरु आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीकडून जागावाटपाची बोलणी जवळपास अंतिम टप्प्यात आली आहे. दुसरीकडे जागावाटप आणि निवडणुकीची रणनिती ठरवण्यासाठी नेत्यांच्या बैठकांचे सत्र सुरु आहे.

उमेदवारीसाठी इच्छुकांकडून वरिष्ठांची भेट घेतली जात असल्याने राज्यभरातील वातावरण ढवळून निघाले आहे. तर दुसरीकडे मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनामुळे राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. (Beed News)

बीडच्या भाजपचे (Bjp) जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्या एका बॅनरवर मनोज जरांगे पाटील यांचा फोटो पाहायला मिळत आहे तर दुसरीकडे माजी मंत्री पंकजा मुंडे आणि इतर भाजप नेत्यांचे बॅनर लावल्याचे दिसत आहे. त्यामुळे त्यांनी निवडणुकीच्या तोंडावरच घेतलेली दुटप्पी भूमिका मतदारसंघात चर्चेचा विषय झाली आहे. मराठवाड्यात तर भाजपविरुद्ध मनोज जरांगे पाटील असा संघर्ष पाहायला मिळत असताना भाजपच्या जिल्हाध्यक्षाने एकाचवेळी दोन भूमिका मांडल्यामुळे बीडमध्ये हा चर्चेचा विषय झाला आहे.

बीडचे भाजप जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के नेहमीच या-ना त्या कारणाने चर्चेत असतात. या आधीही त्यांनी अंतरवली सराटीत जाऊन मनोज जरांगे (Manoj Jarange) यांची भेट घेतली होती. मस्के हे बीड विधानसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. राजेंद्र मस्के हे पंकजा मुंडेंचे खंदे समर्थक आहेत. या आधी राजेंद्र मस्के यांनी मराठा आरक्षणावर आक्रमक भूमिका घेतली होती.

beed News
Mahayuti News : गंगापुरहून महायुतीमध्ये ठिणगी; भाजपच्या बंब यांच्या विरोधात उतरणार अजितदादांचा आमदार

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीवेळी मनोज जरांगे यांनी घेतलेल्या भूमिकेचा भाजपला जोरदार फटका बसला होता. त्यामध्ये पंकजा मुंडे यांचाही पराभव झाला होता. आता तोच फॅक्टर पुन्हा एकदा विधानसभेसाठी चालण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे धनंजय मुंडे यांनीही मनोज जरांगे यांची भेट घेतल्याची चर्चा होती. त्यामुळे येत्या काळात काय होणार याची उत्सुकता सर्वाना आहे.

beed News
MVA News : महाविकास आघाडीत एका-एका जागेसाठी रस्सीखेच; भाकपने मागितल्या 15 जागा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com