छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपने पक्षशिस्त मोडणाऱ्या 22 जणांना पक्षातून काढले.
महापालिका निवडणुकीत बंडखोरी करून अपक्ष किंवा इतर पक्षातून उमेदवारी स्वीकारल्याचा ठपका.
पक्षाच्या अधिकृत भूमिकेविरोधात वक्तव्य केल्यानेही ही कठोर कारवाई करण्यात आली.
Chhatrapati Sambhajinagar News : राज्यातील महापालिका निवडणुकीच्या निवडणुका झाहीर झाल्यानंतर विविध ठिकाणी भाजपमध्ये तिकीटावरून खदखद बाहेर आली होती. छत्रपती संभाजीनगरमध्ये तर जोरदार राडा झाला होता. दरम्यान पक्षातील तब्बल 22 जणांनी पक्षविरोधी भूमिका घेत बंडखोरी केली होती. कोणी दुसऱ्या पक्षातून उमेदवारी घेतली होती. तर कोणी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला होता. पण आता या सर्वांना भाजपने दणका दिला असून थेट कारवाईचा बडगा उगारला आहे. भाजपने पक्षशिस्त मोडणाऱ्या या कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांविरोधात शिस्तभंगांची कारवाई केल्याचा ठपका ठेवत बाहेरचा रस्ता दाखवला आहे. तसेच पक्षाच्या अधिकृत भूमिकेला छेद देणारी वक्तव्ये केल्याचाही ठपकाही या जणांनावर ठेवण्यात आला आहे.
राज्यात नुकताच नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुकींचा निकाल लागला असून या निकालात भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. त्या पाठोपाठ महापालिका निवडणुकीच्या निवडणुका झाहीर झाल्याने भाजपने कंबर कसत रणनीती आखली होती. पण या रणनीतीला पक्षाच्या कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये सूरूंग लावल्याचे समोर आले होते.
ही बंडखोरी पाहता पक्षाने नियमांचे आणि शिस्तीचे पालन न करणाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा आधीच दिला होता. तरीदेखील तब्बल 22 जणांनी पक्षविरोधी भूमिका घेतली होती. आता बंडखोरी करणारे, अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणारे तसेच पक्षशिस्त भंग करणाऱ्या कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांवर भाजपने कारवाईची तलवार चालवली आहे. तसेच या सर्वांना पक्षातून काढून टाकण्यात आले आहे.
या कारवाईबाबत जिल्हाध्यक्ष किशोर शितोळे यांनी माहिती देताना, पक्षशिस्त आणि संघटनात्मक मजबुती राखण्यासाठी अशी कारवाई आवश्यक असल्याचे सांगितले आहे. तसेच भविष्यातही पक्षविरोधी कारवाई करणाऱ्यांना माफी दिली जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
याचबरोबर त्यांनी, छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शंभर ते सव्वाशे लोकांनी अर्ज भरला होता. ज्यानंतर येथे पक्षाच्या वरिष्ठांनी बंडखोरांची समजूत काढली तसेच उमेदवारी अर्ज मागे घेण्याचे आदेश दिले होते. त्याप्रमाणे सर्व उमेदवारांनी अर्ज मागे घेतले.
मात्र 22 जणांनी अर्ज मागे न घेता उमेदवारी कायम ठेवली. त्यासाठी त्यांनी इतर पक्षांचा आधार घेतला. तर काहींना अपक्ष उभरण्याचा निर्णय घेतला. यामुळेच पक्षाने त्यांचे निलंबन केले असून आता त्यांचा आणि पक्षाचा आता कोणताही संबंध नाही, असेही जिल्हाध्यक्ष शितोळे यांनी म्हटले आहे.
Q1. भाजपने किती जणांना पक्षातून काढले आहे?
➡️ एकूण 22 कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना पक्षातून काढण्यात आले आहे.
Q2. ही कारवाई कुठल्या शहरात झाली?
➡️ छत्रपती संभाजीनगर शहरात.
Q3. कारवाईचे मुख्य कारण काय आहे?
➡️ पक्षशिस्त मोडणे, बंडखोरी आणि पक्षविरोधी भूमिका घेणे.
Q4. संबंधितांनी काय केल्यामुळे भाजपने ही कारवाई केली?
➡️ काहींनी अपक्ष किंवा इतर पक्षातून उमेदवारी स्वीकारली आणि पक्षविरोधी वक्तव्ये केली.
Q5. ही कारवाई कोणत्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झाली?
➡️ आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.