Marathwada Graduate Constituency : मराठवाडा पदवीधर मतदारसंघावर भाजपाला हवीयं पून्हा पकड! रविंद्र चव्हाणांनी घातले लक्ष

BJP State President Meeting For Graduate Constituency : कामे करा, केवळ भाषणे ठोकू नका, मतदार नोंदणी करा, अशा शब्दात रविंद्र चव्हाण यांनी पदाधिकारी - कार्यकर्त्यांना जोमाने कामला लागण्याच्या सूचना दिल्या.
BJP State President Ravindra Chavan On Marathwada Graduate Constituency
BJP State President Ravindra Chavan On Marathwada Graduate ConstituencySarkarnama
Published on
Updated on
Summary
  1. मराठवाडा पदवीधर मतदारसंघात पुन्हा पकड मिळवण्यासाठी भाजपाने मोठी तयारी सुरू केली आहे.

  2. मित्रपक्ष राष्ट्रवादी काँग्रेसविरुद्ध लढण्याची भूमिका भाजपाने घेतली आहे.

  3. प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी या निवडणुकीवर विशेष लक्ष केंद्रित केले आहे.

सचिन पवार

BJP Political News : कधीकाळी मराठवाडा पदवीधर मतदारसंघावर मजबूत असलेली भाजपाची पकड गेल्या पंधरा वर्षात सैल झाली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने हा मतदारसंघ भाजपाकडून हिसकावून घेतला. आता तो पून्हा आपल्याकडे खेचण्याचे प्रयत्न भाजपाने सुरू केले आहेत. प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी याकडे विशेष लक्ष देत स्थानिक नेते, पदाधिकाऱ्यांची कानउघाडणी केली आहे.

मराठवाडा पदवीधर मतदारसंघ भारतीय जनता पक्षाच्या ताब्यात यायला हवा. त्या दृष्टीने कामे करा, केवळ भाषणे ठोकू नका, मतदार नोंदणी करा, अशा शब्दात रविंद्र चव्हाण (Ravindra Chavan) यांनी पदाधिकारी - कार्यकर्त्यांना जोमाने कामला लागण्याच्या सूचना दिल्या. सध्या सत्तेत असेल्या राष्ट्रवादी काँग्रेस या मित्र पक्षाचे सतीश चव्हाण हे या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत. तीन टर्म सतीश चव्हाण यांनी भाजपाच्या उमेदवाराचा पराभव करत मराठवाडा मतदारसंघाची जागा राखली आहे.

भाजपाचे (BJP) श्रीकांत जोशी, शिरीश बोराळकर यांचा अनुक्रमे एक आणि दोनदा सतीश चव्हाण यांनी पराभव केला आहे. मराठवाडा पदवीधर आणि मराठवाडा शिक्षक हे दोन्ही प्रतिष्ठेचे मतदारसंघ भाजपाच्या ताब्यात नसल्याची सल राज्यातील नेत्यांना आहे. त्यामुळे यावेळी मराठवाडा मतदारसंघ कुठल्याही परिस्थितीत जिंकायचाच, असा निर्धार रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत करण्यात आला.

BJP State President Ravindra Chavan On Marathwada Graduate Constituency
Ravindra Chavan News: पंतप्रधान मोदींच्या राजकीय निवृत्तीवर भाजपच्या प्रदेशाध्यक्षांची अवघ्या दोन शब्दांत प्रतिक्रिया; म्हणाले...

भाजप प्रदेश मराठवाडा विभाग पदवीधर निवडणूक मतदार नोंदणी अभियानाची बैठक सातारा परिसरातील एमआयटी महाविद्यालयाच्या मंथन सभागृहात आज पार पडली. बैठकीला ओबीसी विकास मंत्री अतुल सावे, खासदार डॉ. भागवत कराड, राज्यसभा खासदार डॉ.अजित गोपछडे, राज्यमंत्री मेघना बोर्डीकर, आमदार संजय केणेकर, अनुराधा चव्हाण, संघटनमंत्री संजय कौडगे, आमदार नारायण कुचे, प्रशांत बंब, प्रदेश सरचिटणीस आमदार विक्रांत पाटील, संभाजी पाटील निलंगेकर, नोंदणी प्रमुख राहुल लोणीकर, सह नोंदणी प्रमुख गुरुनाथ मगे, आमदार तान्हाजी मुटकुळे, शहराध्यक्ष किशोर शितोळे यांची उपस्थिती होती.

BJP State President Ravindra Chavan On Marathwada Graduate Constituency
Marathwada Graduate Constituency News : मराठवाडा पदवीधर मतदारसंघात भाजप मित्रपक्ष राष्ट्रवादीशीच दोन हात करणार ? संजय केनेकर यांच्यावर मोठी जबाबदारी

प्रत्येकी 50 मतदार नोंदणीचे टार्गेट

जास्तीत जास्त मतदार नोंदणीचे लक्ष्य गाठण्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्याने 50 मतदारांची नोंदणी करावी. यासह शहरातून किमान एक लाखावर नोंदणी झाली पाहीजे, अशा सूचनाही रविंद्र चव्हाण यांनी दिल्या. यानंतर महापालिका निवडणूकी संदर्भातही काही प्रमुख पदाधिकर्यांशी त्यांनी चर्चा केली.

FAQs

प्र.१. भाजपाने कोणत्या मतदारसंघावर लक्ष केंद्रित केले आहे?
उ. मराठवाडा पदवीधर मतदारसंघावर.

प्र.२. भाजपाला कोणता पक्ष मुख्य प्रतिस्पर्धी ठरतो आहे?
उ. राष्ट्रवादी काँग्रेस.

प्र.३. भाजपाची रणनीती कशी आहे?
उ. पुन्हा पकड मिळवण्यासाठी थेट राष्ट्रवादीविरुद्ध लढण्याची तयारी आहे.

प्र.४. या निवडणुकीवर लक्ष कोण ठेवत आहेत?
उ. प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण.

प्र.५. या मतदारसंघात भाजपाचा उद्देश काय आहे?
उ. पुन्हा विजय मिळवून पकड मजबूत करणे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com