Beed News : तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (k.Chandrashekhar Rao) यांच्या भारत राष्ट्र समिती पक्षाने नांदेड मार्गे महाराष्ट्रात विस्तार सुरू केला आहे. नांदेड जिल्ह्यात दोन सभा घेत त्यांनी नांदेड, परभणी जिल्ह्यातील अनेक आजी-माजी, शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना पक्षात प्रवेश दिला. राष्ट्रवादी, मनसे, शेतकरी संघटना अशा पक्ष व संघटनेतील अनेक नेते, पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने बीआरएसमध्ये प्रवेश करत आहेत.
नांदेड, परभणीनंतर आता हे लोण बीड जिल्ह्यात देखील पोहचले आहे. (Beed) बीड येथील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) ऊसतोड मजूर सेलचे प्रदेशाध्यक्ष शिवराज बांगर, माजी नगराध्यक्ष दिलीप गोरे यांनी देखील बीआरएसमध्ये प्रवेश केला आहे. हैदराबाद येथे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांची भेट घेत पक्षात प्रवेश केला.
किसानवादचा नारा देत केसीआर यांनी मराराष्ट्रातील विशेषतः शेती क्षेत्रात काम करणाऱ्या सगळ्याच राजकीय पक्षातील नेते, पदाधिकारी, कार्यकर्त्यांवर आपले लक्ष केंद्रीत केले आहे. शिवराज बांगर हे पुर्वी शिवसेनेत होते. नंतर त्यांनी वंचित बहुजन आघाडीत प्रवेश घेतला. पण या पक्षात ते जास्तकाळ टिकू शकले नाही. नंतर त्यांनी मनसेत प्रवेश केला, उसतोड मजुर सेलेचे प्रदेशाध्यक्ष म्हणून ते कार्यरत होते.
दरम्यान, राज्यातील सत्तांतरानंतर त्यांनी पुन्हा ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेशासाठी प्रयत्न सुरू केले होते. मात्र त्यांच्या प्रवेशाला विरोध झाल्यामुळे त्यांनी अखेर बीआरएसची निवड केली. त्यामुळे के. चंद्रशेखर राव यांच्या बीआरएस पक्षात प्रवेश करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.
नांदेड, छत्रपती संभाजीनगर, परभणीतून अनेक महत्वाच्या लोकांनी बीआरएस पक्षात प्रवेश केला आहे. यात प्रामुख्याने कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव, नांदेडचे शेतकरी चळवळीचे नेते, राष्ट्रवादीचे माजी आमदार शंकरअण्णा धोंडगे, यशपाल भिंगे आदींनी आपल्या पुढील राजकीय वाटचालीसाठी तेलंगणातील बीआरएसची निवड केली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.