केंद्रातील भाजप सरकार ब्लॅकमेलर; अधिकाऱ्यांना तोडपणी करायला सांगते

(Congress State President Nana Patole) देशातील तरुणांना ड्रग्जमध्ये डुबवण्याचे पाप बीजेपीचे सरकार करत आहे
Congress Leader Nana Patole
Congress Leader Nana PatoleSarkarnama
Published on
Updated on

बीड ः केंद्रातील भाजपचे सरकार हे अधिकाऱ्यांना हाताशी धरून तोडपाणी करायला सांगते, हे सरकार ब्लॅकमेलर आहे, असा गंभीर आरोप काॅंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला. मुंबईतील ड्रग्ज प्रकरण हे शाहरूख खानच्या मुलाला अडकवण्यासाठी घडवण्यात आल्याचा दावाही पटोले यांनी केला. नाना पटोले हे मराठवाडा दौऱ्यावर असतांना बीड येथील कार्यकर्ता मेळाव्यानंतर प्रसार माध्यमांशी बोलतांना त्यांनी केंद्रातील मोदी सरकारवर घणाघाती टीका केली.

पटोले म्हणाले,लोकशाहीमध्ये पहिल्यांदा अशा पद्धतीने सरकार आलेलं आहे. विरोधात असणाऱ्यांना केंद्रीय तपास यंत्रणाचा वापर करून भीतीचे वातावरण निर्माण केले जात आहे. भाजप सरकारच्या काळात दोन वर्षे छगन भुजबळ कारागृहात होते. आता त्यांची निर्दोष मुक्तता झालीय, केंद्रीय तपास यंत्रणा अधिकाराचा दुरुपयोग करतात, याचं हे उदाहरण आहे. एनसीबीच्या कारवाईमध्ये बीजेपीचा हात असल्याचे स्पष्ट होत आहे.

एवढी मोठी कारवाई केल्याचा दावा तपास यंत्रणेकडून केला जात आहे, मात्र या प्रकरणात अद्याप कुठलेही व्हिडिओ समोर आलेले नाहीत. शाहरुख खानच्या मुलाला अडकवण्यासाठी केलेले हे प्रकरण होते का? असा प्रश्न या निमित्ताने पडतो. या माध्यमातून हिंदू-मुस्लीमांमध्ये तेढ निर्माण करून त्यावर आपली राजकीय पोळी भाजण्याचा हा प्रकार असल्याचेही पटोले म्हणाले.

मुंब्रा पोर्ट येथे २१ हजार कोटीचे जे ड्रग्ज मिळाले त्यात पोर्ट कुणाच्या ताब्यात होती? त्याचा मालक कोण होता? देशात आतापर्यंत किती आले याची चौकशी व्हावी, अशी मागणी देखील त्यांनी केली. देशातील तरुणांना ड्रग्जमध्ये डुबवण्याचे पाप बीजेपीचे सरकार करत आहे, असेही पटोले म्हणाले.

Congress Leader Nana Patole
ज्या शरद पवारांच्या मुलाखतीसाठी तीन तास ताटकळायचो, आज त्यांच्या बाजूला बसतो

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com