Sanjay Shirsat On Shivsena (UT) News : भाजपने ठाकरेंना मुख्यमंत्री पद देण्याचे मान्य केले होते, पण पवारांनी गुगली टाकली..

Shivsena : मुख्यमंत्री म्हणून पुर्ण पाच वर्ष देण्याची तयारी दर्शवली. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी आपला निर्णय फिरवला.
Uddhav Thackeray -Sanjay Shirsat News
Uddhav Thackeray -Sanjay Shirsat NewsSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra : शिवसेना-भाजप युतीला २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत बहुमतासह सत्ता मिळाली होती. उद्धव ठाकरेंना अडिच वर्ष मुख्यमंत्रीपद देण्याचेही भाजपने मान्य केले होते. (Sanjay Shirsat On Shivsena (UT) News) एकनाथ शिंदे यांनी तेव्हाही पहिले अडीच वर्ष शिवसेनेकडे मुख्यमंत्रीपद आणि नंतरच्या काळात भाजपकडे असेही ठरले. पण ऐनवेळी शरद पवारांनी गुगली टाकली आणि शिवसेना-भाजपचे फाटले, असा नवा गौप्यस्फोट शिवसेनेचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी केला आहे.

Uddhav Thackeray -Sanjay Shirsat News
Sanjay Shirsat On Shivsena (UT) News : मेळाव्याला दोनशे लोकं जमतं नसतील तर आपली अवस्था काय ? हे ओळखा..

प्रसार माध्यमांशी बोलतांना शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी हा दावा करतांना पवारांनी उद्धव ठाकरेंना संपुर्ण पाच वर्षाचे मुख्यमंत्रीपद देण्याची तयारी दाखवली आणि त्यानंतर ठाकरेंचे डोळे दिपले आणि त्यांनी भाजपसोबतची युती तोडली, असेही शिरसाट म्हणाले. राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळून वर्ष होत आले, तरी देखील तेव्हा नेमकी युती कशावरून तुटली याची चर्चा अजूनही केली जाते.

उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी अमित शहांनी बंद खोलीत दिलेला शब्द मोडला असा आरोप केला होता. तर मुख्यमंत्रीपदाचा कोणाताही शब्द आम्ही दिला नव्हता, असा दावा भाजपकडून केला गेला. (Sharad Pawar) मात्र यावर आता शिवसेनेचे प्रवक्ते तथा आमदार संजय शिरसाट यांनी वेगळाच दावा करत खळबळ उडवून दिली आहे. संजय शिरसाट म्हणाले, शिवसेना-भाजप युतीला बहुतम मिळाल्यानंतर सत्ता स्थापनेपुर्वीच अडीच-अडीच वर्ष मुख्यमंत्री पदाचा फाॅर्म्युला भाजपने मान्य केला होता.

शिवसेना-भाजपचे सगळे नेते एकमेकांच्या संपर्कात होते. तेव्हा देखील एकनाथ शिंदे यांनीच पुढाकार घेतला होता. भाजपकडून गिरीश महाजन वगैरे सतत चर्चा करत होते. फक्त पहिली अडीच वर्ष शिवसेनेला मुख्यमंत्रीपद मिळावे, असा आमचा आग्रह होतो. त्याला देखील भाजपने तयारी दाखवली होती. पण ऐनवेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी गुगली टाकली.

उद्धव ठाकरे यांना महाविका आघाडी सरकारचे मुख्यमंत्री म्हणून पुर्ण पाच वर्ष देण्याची तयारी दर्शवली. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी आपला निर्णय फिरवला आणि भाजपसोबतची युती तोडून महाविकास आघाडीसोबत जाण्याचा निर्णय घेतला, असा दावा शिरसाट यांनी केला. उद्धव ठाकरे यांचा हा निर्णय शिवसेनेच्या आमदारांना पटला नव्हता, सातत्याने या सरकारमधून बाहेर पडण्याचा आग्रह आम्ही त्यांच्याकडे धरत होतो, असेही शिरसाट यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com