Chhatrapati Sambhajinagar Mayor: भाजपाकडे 'अब तक सत्तावन्न', MIMकडूनही महापौरपदावर दावा; इम्तियाज जलील चमत्कार घडविणार?

BJP Vs MIM : इम्तियाज जलील यांनी महापौर पदाच्या निवडणुकीत आम्ही भाजपला धक्का देऊ असा दावा केला आहे. त्यामुळे दहा फेब्रुवारी रोजी होणाऱ्या महापौर, उपमहापौर पदाच्या निवडीकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत.
Chhatrapati Sambhajinagar Mayor
Chhatrapati Sambhajinagar MayorSarkarnama
Published on
Updated on

Chhatrapati Sambhajinagar News : छत्रपती संभाजीनगर महापालिकेत स्वबळावर सत्तेचं भाजपाचं स्वप्न यावेळी पूर्ण झालं. युतीसाठी शिवसेनेनं अधिक ताणल्यामुळे भाजपासोबत त्यांचे तुटले. पण हे तुटणेच भाजपाच्या पथ्यावर पडले आणि कधी नव्हे ते भाजपाला 57 जागा एकट्याच्या जीवावर निवडून आणता आल्या. बहुमतासाठी एक नगरसेवकाच्या पाठिंब्याची गरज असल्याने स्थानिक नेते निश्चिंत आहेत. मात्र, एमआयएमने महापौर पदावर दावा सांगत राजकारणात काहीही घडू शकते, असे म्हणत चुरस निर्माण केली आहे. महापौर, उपमहापौर पदासाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये उद्या (ता.4) अर्ज भरले जाणार आहेत.

महापालिकेत भाजपाकडे सर्वाधिक 57 नगरसेवक असल्याने त्यांचा महापौर, उपमहापौर या दोन्ही पदांवरचा दावा प्रबळ मानला जातो. तर 33 नगरसेवकांसह दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरलेल्या एमआयएमने भाजपाला रोखण्यासाठी शिंदेंच्या शिवसेनेसह विरोधातील काँग्रेस, राष्ट्रवादी, वंचित आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला साद घातली आहे. इम्तियाज जलील यांनी महापौर पदाच्या निवडणुकीत आम्ही भाजपला धक्का देऊ असा दावा केला आहे. त्यामुळे दहा फेब्रुवारी रोजी होणाऱ्या महापौर, उपमहापौर पदाच्या निवडीकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत.

छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या महापौर, उपमहापौर निवडणुकीसाठी बुधवारी (ता. चार) सकाळी दहापासून उमेदवारी अर्जांचे वितरण महापालिकेच्या सचिव विभागातून करण्यात येणार आहे. शुक्रवारी (ता. सहा) दुपारी तीनपर्यंत अर्जवाटप आणि त्याच दिवशी सायंकाळी सहापर्यंत अर्ज भरण्याची अंतिम वेळ राहणार आहे. महापौर, उपमहापौर पदासाठी अर्जांचे वितरण सुरू झाले तरी भाजपने अद्याप महापौर कोण असेल? याचे पत्ते ओपन केलेले नाहीत. त्यामुळे महापालिकेची 15 जानेवारीला निवडणूक होऊन 16 ला मतमोजणी झाली.

दरम्यान, राज्य सरकारने महापौरपदासाठीची आरक्षण सोडत काढली, त्यात सर्वसाधारणसाठी महापौराचे आरक्षण सुटले आहे. त्यानुसार छत्रपती संभाजीनगरच्या महापौरपदी कोण बसणार? याविषयी तर्कवितर्क लावले जात आहेत. महापालिका प्रशासनाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. त्यानुसार 10 फेब्रुवारीला सकाळी 11 वाजता महापौर त्यानंतर उपमहापौरांची निवडणूक होणार आहे.

Chhatrapati Sambhajinagar Mayor
Parbhani News : परभणीत ऐनवेळी मोठा ट्विस्ट, काँग्रेसचा महापौर पदावर दावा, अर्जही भरला; ठाकरेंच्या खासदाराची वाढली धडधड

पीठासन अधिकारी तथा जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या अध्यक्षतेखाली महापालिकेच्या विशेष सभेला सुरवात होईल. सभा सुरू होताच प्राप्त अर्जांची पीठासन अधिकारी छाननी करतील. उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी 15 मिनिटांचा अवधी देण्यात येईल. महापौर, उपमहापौर पदांसाठी निवडणूक रिंगणात असलेल्या उमेदवारांची नावे मराठी वर्णनाक्रमाने घोषित करण्यात येतील. ज्या उमेदवारांचे नाव पुकारण्यात येईल, त्या उमेदवाराच्या समर्थनार्थ उपस्थित नगरसेवकांना मतदान करता येईल.

महापौर, उपमहापौर पदांसाठी निवडणूक रिंगणात असलेल्या उमेदवारांची नावे मराठी वर्णानुक्रमाणे घोषित करण्यात येतील. ज्या उमेदवारांचे नाव पुकारण्यात येईल, त्या उमेदवाराच्या समर्थनार्थ उपस्थित नगरसेवकांना मतदान करता येईल.

Chhatrapati Sambhajinagar Mayor
PMC News: CM फडणवीसांनी सकाळी 9 वाजताच फिरवला फोन; आठवलेंचा कार्यकर्ता पोहोचला थेट पुणे महापालिकेत सर्वोच्च स्थानी

या मतांची नोंद कार्यवृत्तांतात केली जाणार आहे. ज्या नगरसेवकाने मतदान केले नाही, त्याचीही नोंद राहील. उमेदवारांना समान मते असल्यास पीठासन अधिकारी चिठ्ठ्या टाकून सोडत काढण्याचा निर्णय घेतील. चिठ्ठी कोणी काढावी याचा निर्णय बहुमताने पालिका सदस्य घेतील. ज्याच्या नावाची चिठ्ठी असेल तो उमेदवार निवडून आल्याचे घोषित करण्यात येणार असल्याचे निवडणूक कार्यक्रमात नमूद केले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com