Nanded News : राजकारणात कोणी कोणाचा कायमचा शत्रू नसतो, तर कोणी मित्रही. गेल्या काही वर्षांत घडलेल्या घटनांवरून हे सहजपणे लक्षात येईल. नांदेड जिल्ह्यातील दोन कट्टर विरोधक म्हणून ओळखले जाणारे चिखलीकर व चव्हाण आज एकाच पक्षात येऊन विजयाचे दावे करत आहेत. नांदेड जिल्ह्याच्या राजकारणात सध्या चिखलीकर व चव्हाण यांच्यात समझोता एक्स्प्रेस सुरू आहे. तुझ्या गळा माझ्या गळा गुंफू मोत्यांच्या माळा असा सूर आळवत मागचे सारे विसरून हे दोघे एकाच व्यासपीठावर दिसून येत आहेत.
भारतीय जनता पक्षाने घोषित केलेल्या दुसऱ्या उमेदवारी यादीत चिखलीकरांचे नाव घोषित करण्यात आले आहे. त्यांच्या उमेदवारीचे अशोक चव्हाण यांनी स्वागत करून शुभेच्छा दिल्या आहेत. नांदेडची निवडणूक गेल्या वर्षी लक्षवेधी झाली होती. या लढतीत चिखलीकरांनी अशोक चव्हाण यांचा पराभव केला होता. भारतीय जनता पक्षात नांदेडच्या जागेसाठी चार उमेदवार इच्छुक होते. उमेदवारीसाठी रस्सीखेच सुरू असताना त्यात चिखलीकरांनी बाजी मारली.
मुंबईतील पक्ष कार्यालयात उमेदवारी घोषित झाल्यानंतर चिखलीकरांनी सदिच्छा भेट दिली. या वेळी अशोक चव्हाण यांनी चिखलीकरांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. नांदेड लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या सहा मतदारसंघांपैकी दोन मतदारसंघ भाजपकडे, दोन काँग्रेस, एक शिवसेना शिंदे गट, तर भोकर विधानसभा मतदारसंघातून स्वतः अशोक चव्हाण निवडून आले होते. भाजप (BJP) प्रवेशाआधी त्यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला.
गेल्या लोकसभा निवडणुकीत भोकर, नांदेड उत्तर, नांदेड दक्षिण या विधानसभा मतदारसंघात तत्कालीन काँग्रेसचे उमेदवार अशोक चव्हाण यांनी मताधिक्य घेतले होते. भाजपत चव्हाण आल्याने आता या मतदारसंघातील चित्र बदलले आहे. या तीन मतदारसंघांत अशोक चव्हाणांना आता प्रतापराव चिखलीकरांसाठी (Prataprao Chikhalikar) मतं मागावी लागणार आहेत. तर देगलूर- बिलोली, मुखेड या भागात माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांची भूमिका महत्त्वाची असेल.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्यानंतर काही तासांतच पक्षाने अशोक चव्हाण यांना भाजपने राज्यसभेवर पाठवत खासदार केले. याची परतफेड म्हणून नांदेडसह लातूर, हिंगोली लोकसभा मतदारसंघांतून महायुतीच्या उमेदवारांच्या विजयाची गॅरंटी घेऊन अशोक चव्हाण यांना काम करावे लागणार आहे. नांदेड लोकसभेत पुन्हा भाजपचे कमळ फुलणारच असा दावा पक्षाकडून केला जातोय. पण अशोक चव्हाण (Ashok Chavan) सोबत असल्याने मताधिक्य किती राहील याचीच आम्ही वाट पाहत असल्याचे भाजपचे स्थानिक नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते सांगत आहेत.
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.