

Latur News: विधान परिषदेचे नवनिर्वाचित आमदार बसवराज पाटील यांनी लातूरच्या सत्कार समारंभात केलेल्या भाषणाची सध्या जिल्ह्यात चर्चा सुरू आहे. आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी बसवराज पाटील आमच्याकडे आल्यामुळे आता लातूरमध्ये निश्चित बदल घडेल, असा विश्वास व्यक्त करत तुम्ही बोललं पाहिजे, असे आवाहन केले होते. संभाजी पाटील निलंगेकर यांच्या भाषणाचा संदर्भ देत बसवराज पाटील यांनी 'मी बोलत नाही, पण केल्याशिवाय राहत नाही' असा सूचक इशारा दिला.
दिवंगत नेते विलासराव देशमुख यांच्याकडे पाहून लातूरकरांनी अमित देशमुख यांच्या नावाचा चेक तीनवेळा पास केला, आता तो करू नका, असे आवाहन आपल्या भाषणातून केले होते. औसा-निलंग्यामध्ये देशमुख यांच्याकडून कसे भांडण लावण्याचा प्रयत्न केला जातो, याचा किस्साही सांगीतला होता. या सगळ्या बाबींचा उल्लेख करत बसवराज पाटील यांनी संयमित भाषण केले. लातूरचे प्रतिनिधित्व आगामी काळात कोणाला द्यायचे? ते नाव मला माहित आहे, पण आज नाव घेतले तर वाद होईल, असे म्हणत त्यांनी उपस्थितांची उत्सूकता ताणली.
संभाजी पाटील निलंगेकरांनी औसा, निलंगा, लातूरचा उल्लेख केला, औशामध्ये आमचे अभिमन्यू पवार चांगले प्रतिनिधित्व करत आहेत, निलंग्यात संभाजी पाटील निलंगेकर असल्यामुळे बघण्याचे काम नाही, त्यांचे प्रतिनिधित्वही उत्तम आहे. लातूर ग्रामीणमध्ये आमचे रमेशअप्पा कराड हे ही चांगले काम करत आहेत, असे सांगत लातूर विधानसभेत पुढे कोणाला प्रतिनिधित्व द्यायचे ते ही मला माहित आहे. पण ते नाव आताच जाहीर करणार नाही.
मी बोलत नसलो तरी जे ठरवलं ते केल्याशिवाय राहत नाही, असे सांगत त्यांनी लातूर जिल्ह्याच्या राजकारणात आपण आता पूर्णपणे सक्रीय होणार असल्याचे संकेत त्यांच्या भाषणातून दिले. बसवराज पाटील यांची लातूर-धाराशीव-बीड स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून नुकतीच मोठ्या मताधिक्याने विधान परिषदेवर निवड झाली.
या निमित्ताने लातूर भाजपाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात संभाजी पाटील निलंगेकर यांनी लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणूकीवरून आमदार अमित देशमुख, धीरज देशमुख आणि दिलीपराव देशमुख यांच्यावर टीका केली होती. निलंगेकर यांच्या भाषणानंतर काँग्रेसच्या नेत्यांनी सोशल मीडियावर त्यांना ट्रोलही केले. याच कार्यक्रमात आमदार बसवराज पाटील यांनी मात्र संयमित भाषण करत देशमुखांवर उघड टीका करणे टाळले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.