Bhagwat Karad: विधानसभेपूर्वी बडा धमाका होणार; भागवत कराडांचा दावा; राजू शिंदेंनी BJP का सोडली?

Bhagwat Karad ON Raju Shinde join Thackeray group: राजू शिंदे गेल्यामुळे आम्हाला कोणताही फरक पडणार नाही. लोकसभेची जागा आम्हाला सुटली नाही, याची खदखद त्यांच्या मनात होती, असे भागवत कराड म्हणाले.
Bhagwat Karad
Bhagwat KaradSarkarnama

छत्रपती संभाजीनगर येथील भाजपचे माजी उपमहापौर राजू शिंदे (Raju Shinde)यांनी काही समर्थकांसह ठाकरे गटात प्रवेश केला आहे. त्यांच्या प्रवेशामुळे भाजपला खिंडार पडल्याचे बोलले जाते.

भाजपचे नेते, माजी मंत्री भागवत कराड (Bhagwat Karad) यांनी त्यावर सडेतोड उत्तर दिले. राजू शिंदे ठाकरे गटात गेल्यामुळे भाजपला कोणताही फरक पडणार नाही, असे त्यांनी सांगितले. विधानसभा निवडणुकीपूर्वी आमच्याकडे देखील बडे नेते येणार असून बडा धमाका होणार असल्याचा दावा कराड यांनी केला आहे.

भाजपमध्ये गेल्या 20 वर्षांपूर्वी कमळाच्या चिन्हावर निवडून आलेले एकमेव नगरसेवक म्हणजे राजू शिंदे आहेत. दोन नगरसेवक सोडता कोणीही भारतीय जनता पार्टी सोडलेली नाही. त्यामुळे फार काही खिंडार पडले असे म्हणता येणार नाही. राजू शिंदे गेल्यामुळे आम्हाला कोणताही फरक पडणार नाही. लोकसभेची जागा आम्हाला सुटली नाही, याची खदखद त्यांच्या मनात होती, असे भागवत कराड म्हणाले.

Bhagwat Karad
Nana Patole: 'फडणवीस हरिश्चंद्र आहेत का? खोटा नरेटिव्ह कोणी सेट केला?' नाना पटोले संतापले

राजू शिंदे यांना आगामी विधानसभा निवडणूक ही छत्रपती संभाजीनगर पश्चिम मतदार संघातून लढवायची आहे. त्यामुळे त्यांनी ठाकरे गटात प्रवेश केला.मात्र महायुतीचे संजय शिरसाट त्याठिकाणी विद्यमान आमदार आहेत. राजू शिंदे यांना ठाकरे गटातून उमेदवारी मिळेल म्हणून ते तिकडे गेले आहेत. त्यांच्या जाण्यामुळे भाजपला कोणतीही गळती लागलेली नाही, असे कराड यांनी स्पष्ट केले.

राजू शिंदे यांना ठाकरे गटाकडून आश्वासन दिले असल्यामुळे ते ठाकरे गटात गेले, असे भागवत कराड यांनी स्पष्ट केले. संभाजीनगर पश्चिम मतदार संघातून चंद्रकांत खैरे यांच्यासह दहा जण विधानसभेची तयारी करीत असल्याचे दावा कराड यांनी केला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com