Nana Patole: 'फडणवीस हरिश्चंद्र आहेत का? खोटा नरेटिव्ह कोणी सेट केला?' नाना पटोले संतापले

Nana Patole criticizes Devendra Fadnavis Fake Narrative Of Opposition: मुसळधार पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असताना अधिवेशात, मात्र सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर चांगले तापले आहेत. नाना पटोले यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्ला चढवला.
 Nana Patole News
Nana Patole NewsSarkarnama
Published on
Updated on

खोटा नरेटिव्हवरून नाना पटोले यांनी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्यावर टीका केली आहे. मराठा, धनगर आणि इतर समाजाला आरक्षण देऊन 2014 मध्ये सत्तेत कोण आले. त्यावेळेस खोटा नरेटिव्ह कोणी सेट केला? असा सवाल नाना पटोले (Nana Patole) यांनी केला.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लोकसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीला मिळालेल्या यशानंतर खोटं नरेटिव्ह मुद्द्यावरून सातत्याने बोलत आहेत. विरोधकांनी खोटं नरेटिव्ह तयार करून यश मिळवले असल्याच्या विधानाचा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांनी खास शैलीत समाचार घेतला.

नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. "देवेंद्र फडणवीस हे काय हरिश्चंद्र आहेत काय? सत्य हा त्यांचा काही पिंड आहे का. खोटं नरेटिव्ह सेट करण्यात कोण पुढे होतं हे सर्व महाराष्ट्राला माहित आहे", अशा शब्दात नाना पटोले यांनी टीका केली.

मुंबईत पावसाळी अधिवेशन सुरू आहे. कालपासून मुंबईत मुसळधार पाऊस सुरू असून मुंबईतील अनेक भागात पाणी साचले आहे. मुसळधार पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असताना अधिवेशात, मात्र सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर चांगले तापले आहेत. यातच नाना पटोले यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्ला चढवला.

 Nana Patole News
Chandrakant Raghuvanshi: शिंदेंच्या शिलेदारानेच केला भाजप उमेदवाराचा 'गेम'; हिना गावित यांचा का झाला पराभव

देवेंद्र फडणवीस हे स्वतः हरिश्चंद्र आहे का? सत्य हा त्यांचा पिंड आहे?, असा स्वतःभोवती खोटा नरेटिव्ह निर्माण करून घेत असतील, तर महाराष्ट्रात मराठा, धनगर किंवा इतर समाजाच्या आरक्षणाचे खोटे नरेटिव्ह कोणी निर्माण केले? ते 2014 मध्ये देवेंद्र फडणवीस यांनी तयार केले होते. खोटं बोलून सत्ता घेतली. काँग्रेसला खोटं करता करता हेच जनतेसमोर खोटारडे आहेत, हे सिद्ध झाले आहे. राज्यात खोटं निगेटिव्ह नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस यांनी सुरू केले आहे, असा घाणाघात नाना पटोले यांनी केला.

भाजप आणि त्यांच्या मित्र पक्षाच्या राज्यात खोटं नरेटिव्हच्या जोरावर सत्ता मिळवली. गेली दहा वर्ष भाजप या खोटं नरेटिव्हच्या जोरावर सत्तेत आहे. कारण देवेंद्र फडणवीस हे खोटं नरेटिव्ह सेट करण्याचे मास्टरमाइंड आहेत आणि आता हे खोटं नरेटिव्ह सांगता सांगता त्यांच्याच जाळ्यात ते अडकले असल्याचेही नाना पटोले, यांनी म्हटले.

 Nana Patole News
Video Mumbai Heavy Rain: मुंबईतील पावसाचा फटका आमदारांना; मदत, पुनवर्सन मंत्री अनिल पाटील अडकले ट्रेनमध्ये!

लाडकी बहीण देखील यांना वाचू शकणार नाही

लोकसभेच्या निवडणुकीनंतर महाविकास आघाडीला मिळालेले यश आणि महायुतीला महाराष्ट्रात बसलेला फटका, यामुळे राज्यातील सत्ताधारी गडबडून गेले आहेत. त्यामुळे त्यांनी मुख्यमंत्री मझी लाडकी बहीण योजना आणली आहे. परंतु ही लाडकी बहीण देखील त्यांना वाचवणार नाही. महाराष्ट्रातल्या तमाम बहिणींनी दीड हजार रुपयांचे सरकारचे हे गाजर ओळखले आहे. त्यामुळे राज्य सरकारने प्रशासनाला इतर कामे ठप्प ठेवून या योजनेचे मागे लावले असले, तरीही त्यांना येणाऱ्या विधानसभेत यश मिळणार नाही, असा दावा पटोले यांनी केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com