Beed Murder Case : बीडचा बिहार होतोय ? सरपंचाच्या हत्येनंतर शरद पवारांचा खासदार संतापला; पोलिस अधिक्षकांवर गंभीर आरोप

Transfer Beed SP, MP Bajrang Sonawane demands : माणुसकीला काळीमा फासणारी ही घटना आहे. दोन आरोपींना अटक करण्यात आली असली तरी मुख्य आरोपीला पोलिसांनी पळवून लावयचे आहे का? असा सवाल सोनवणे यांनी यावेळी उपस्थित केला.
MP Bajrang Sonawane
MP Bajrang SonawaneSarkarnama
Published on
Updated on

नवी दिल्ली : बीड जिल्ह्यातील मस्साजोगच्या सरपंचाच्या खुनाने मराठवाडा हादरला आहे. इकडे दिल्लीतही या खुनाची चर्चा होत असून खासदार बजरंग सोनवणे यांनी या घटनेवर तीव्र संताप व्यक्त केला आहे. बीडचा बिहार होतोय, अशा शब्दात त्यांनी जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. लोकसभेच्या अधिवेशनासाठी दिल्लीत असलेल्या बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी सरपंचाच्या खून प्रकरणी संताप व्यक्त केला.

बीड जिल्ह्यात घडलेले हा खुनाचा प्रकार गंभीर आहे, या घटनेचा मी निषेध करतो. बीडचा बिहार होतोय की काय? अशी परिस्थिती जिल्ह्यात निर्माण झाली आहे. (MP Bajrang Sonawane) मस्साजोगच्या सरपंचाला अपहरण करून त्याचे डोळे काढत क्रूर पद्धतीने मारण्यात आले आहे. या खून प्रकरणातील आरोपींना तत्काळ अटक झाली पाहिजे.

MP Bajrang Sonawane
Bajrang Sonawane on Dhananjay Munde : बीडमधलं राजकारण टोकाला; धनंजय मुंडेंना राक्षस, रावण म्हटल्यानंतर आता थेट भुताची उपमा!

या आरोपींवर खंडणी मागितली म्हणून दोन दिवसाआधीच गुन्हा दाखल झाला होता, पण त्यांना लगेच जामीन मिळाला. (Beed News) काल दुपारी चार वाजेपासून मी बीडच्या पोलिस अधिक्षकांना फोन करतोय, पण त्यांनी माझा फोन उचलला नाही. माझ्याकडे सगळे रेकॉर्ड आहे, रात्री त्यांनी उशिरा फोन उचलला, असा आरोप सोनवणे यांनी दिल्लीत माध्यमांशी बोलताना केला.

MP Bajrang Sonawane
Beed Murder Case News : सरपंच देशमुख खुन प्रकरणी दोघांना अटक, फरार आरोपींच्या शोधासाठी सहा पथके

माणुसकीला काळीमा फासणारी ही घटना आहे. दोन आरोपींना अटक करण्यात आली असली तरी मुख्य आरोपीला पोलिसांनी पळवून लावायचे आहे का? असा सवाल सोनवणे यांनी यावेळी उपस्थित केला. धाराशिव जिल्ह्यातील गुंड आमच्याकडे दहशत पसरवत आहेत. त्यांचे पुणे लाईन कनेक्शन असल्याचे समजत आहे, असा दावा सोनवणे यांनी केला.

MP Bajrang Sonawane
Beed Crime News : सरपंचाच्या खुनानंतर व्यापाऱ्याच्या अपहरणाची घटना, बीडचा बिहार होतोय का?

खुन होऊन सत्तावीस तास होऊन देखील पोलीस काहीही करत नाही. पोलिसांच्या समोर आरोपी पळून गेले अशी माझी माहिती आहे. परळीत एका व्यापाऱ्याला उचलून नेत त्याचे अपहरण करण्यात आले. बलाढ्य नेते जिल्ह्यात आहेत, मग अशा घटना जिल्ह्यात का घडत आहेत? असा सवाल सोनवणे यांनी उपस्थित केला.

MP Bajrang Sonawane
Pune Crime News : पुण्यातील भाजप आमदाराच्या मामाचं भर चौकातून अपहरण; हडपसर पोलीस चौकीत गुन्हा दाखल

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात लक्ष घालावे, अशी मागणीही बजरंग सोनवणे यांनी यावेळी केली. तसेच जिल्ह्याच्या पोलिस अधिक्षकांची तत्काळ बदलल पाहिजे, पोलिस निरीक्षकांचे निलंबन केले पाहिजे, असेही सोनवणे म्हणाले. या लोकांना पोलीस यंत्रणेची साथ आहे असे वाटते, असा आरोपही त्यांनी केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com