Parbhani Hingoli MLC: राष्ट्रवादीला डच्चू देण्यासाठी भाजपचे स्थानिक नेते एकवटले; मेघना बोर्डीकर पाच इच्छुकांसह 'देवाभाऊं' च्या दरबारी

MLC Election 2026 : परभणीत पक्षाचे पारडे जड असलेल्या भाजपाला हिंगोलीत मित्र पक्षाची मदत निवडून येण्यासाठी घ्यावी लागणार आहे. परभणीत भाजपाने आमदार रत्नाकर गुट्टे, जनसुराज्य पक्षाच्या जागा आपल्याच असल्याचा दावा करत आकडे फुगवले आहेत.
Meghna Boardikar CM Fadnavis .jpg
Meghna Boardikar CM Fadnavis .jpgSarkarnama
Published on
Updated on

Marathwada Politics : राज्यात महायुती असली तरी स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात आपापले वर्चस्व राखण्यासाठी तीनही पक्षांनी पडद्यामागे जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत. परभणी-हिंगोलीची जागा राष्ट्रवादीला सुटण्याची शक्यता लक्षात घेता परभणी जिल्ह्यातील भाजपा नेत्यांनी अंतर्गत मतभेद बाजूला सारत एकजुटीचे दर्शन घडवले. पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या नेतृत्वाखाली पाच इच्छुकांनी देवाभाऊंच्या दरबारात हजेरी लावत मतदारसंघ भाजपाला सोडवून घेण्यासाठी साकडे घातले.

दिल्लीत महाराष्ट्रातील सतरा विधान परिषदेच्या जागा वाटपावरून तानातानी सुरू आहे. भाजपाने आकडेवारीचा दाखला देत आम्हीच नंबर एक असल्याचा दावा करत सर्वाधिक जागांसाठी आग्रह धरला आहे.

तर शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला एक आकडी जागा देण्याची तयारी दर्शवत आपले घोडे पुढे दामटले आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली असली तरी अद्याप जागा वाटपावर शिक्कामोर्तब झालेले नाही. तीनही पक्षामधील इच्छुकांनी आपापल्या नेत्यांकडे याद्या देत दावेदारी सुरू केली आहे.

परभणी-हिंगोली हा मतदारसंघ शिवसेनेकडे असला तरी जिल्ह्यातील बदलती राजकीय समीकरणे पाहता तो राखण्याचे मोठे आव्हान या पक्षासमोर असणार आहे. दुसरीकडे संख्याबळाचे आकडे समोर ठेवत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने या जागेवर दावा केला आहे. जागा वाटपाच्या तानातानीत परभणी-हिंगोलीची जागा राष्ट्रवादीच्या वाट्याला जाण्याची शक्यता अधिक वाटते. या पार्श्वभूमीवर भाजपामधील इच्छुकांनी आपले मतभेद तुर्तास बाजूला ठेवून पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या नेतृत्वात काल मुख्यमंत्र्‍यांची मुंबईत भेट घेतली.

Meghna Boardikar CM Fadnavis .jpg
Solapur BJP Politics: सोलापूरमध्ये भाजप शिंदेंचाच डाव 'रिपीट' करणार;दिग्गजांचा पत्ता कट? विधान परिषदेसाठी 3 महिला नेत्यांची नावं समोर

पाच इच्छुकांची यादी फडणवीसांकडे सोपवत मतदारसंघ सोडवून घेण्यासाठी गळ घातली आहे. इच्छुकांमध्ये जिल्हाध्यक्ष सुरेश भुमरे, सभापती गंगाधर बोर्डीकर, माजी जिल्हाध्यक्ष संतोष मुरकुटे, महानगराध्यक्ष शिवाजी भरोसे तसेच हिंगोलीचे जिल्हाध्यक्ष गजानन घुगे यांची नावे आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या यादीत माजी आमदार विजय भांबळे यांचे नाव येताच मेघना बोर्डीकर यांनी भाजपा इच्छुकांची दावेदारी अधिक बळकट करण्याचा प्रयत्न केला.

राष्ट्रवादीकडून भांबळे यांना उमेदवारी मिळणे पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या राजकारणाला अडचणीचे ठरू शकते. हा धोका पाहता बोर्डीकर यांनीच पुढाकर घेत हा मतदारसंघ भाजपाला सोडवून घेण्यासाठी शक्तीपणाला लावल्याचे बोलले जाते.

Meghna Boardikar CM Fadnavis .jpg
Manoj Jarange: जरांगे-लाड भेटीला सहा दिवस झाले, सरकारकडून कुठलाच निरोप नाही; उद्या जरांगे मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत, बोलावली पत्रकार परिषद

परभणीत पक्षाचे पारडे जड असलेल्या भाजपाला हिंगोलीत मित्र पक्षाची मदत निवडून येण्यासाठी घ्यावी लागणार आहे. परभणीत भाजपाने आमदार रत्नाकर गुट्टे, जनसुराज्य पक्षाच्या जागा आपल्याच असल्याचा दावा करत आकडे फुगवले आहेत. एकट्या पक्षाचा विचार केला तर परभणीमध्ये राष्ट्रवादीचा आकडा भाजपापेक्षा जास्त आहे.

दुसरीकडे शिवसेनेकडे मित्र पक्षांपेक्षा कमी संख्याबळ असले तरी गेल्यावेळी हा मतदारसंघ आमच्याकडे होता. या एकाच कारणामुळे परभणी-हिंगोलीवर दावा सांगितला जात आहे. शिंदेसेनेकडून विप्लव बजोरिया यांना दुसऱ्यांदा कामाला लागा, असा निरोप मिळाल्याची चर्चा आहे.

Meghna Boardikar CM Fadnavis .jpg
Yavatmal-Washim MLC election: काँग्रेसने निवडणुकीपूर्वीच शस्त्र टाकली; उमेदवारीसाठीच्या ‘रसद’मुळे विधानपरिषदेच्या मैदानात बॅकफूटवर

दुसरीकडे आमदार संतोष बांगर यांनी राम कदम यांच्या नावासाठी आपले वजन वापरले आहे. आनंद भरोसे, सईद खान यांनी स्वबळावर उमेदवारी खेचून आणण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com