

Solapur News: महाराष्ट्रात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधानपरिषदेच्या 17 जागांसाठी निवडणुकीची जोरदार धामधूम सुरू आहे. महायुतीत इच्छुकांची मोठी गर्दी असून त्यात भर म्हणजे विरोधी पक्षातीलही अनेकजण पक्षप्रवेश उरकून घेत आहेत. भाजप,राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या महायुतीतील तीनही पक्षांनी अद्याप उमेदवारांबाबतचा सस्पेन्स कायम ठेवलेला आहे. तर दुसरीकडे सर्वच इच्छुकांनीही 'अभी नही तो कभी नही'चा नारा देत विधान परिषदेसाठी जोरदार फिल्डिंग लावली आहे. याचदरम्यान,सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात नवा धक्कादायक टर्न आला आहे.
भाजप मंत्री जयकुमार गोरे यांनीही काही दिवसांपूर्वीच माध्यमांशी संवाद साधताना सोलापूर विधानपरिषदेबाबत मोठं विधान केलं होतं. त्यांनी सोलापूरमधील स्थानिक विधान परिषद निवडणुकीत मोठ्या संख्याबळाचा दाखला देत या निवडणुकीनं इतिहास घडवावा असं म्हटलं होतं.
तसेच सोलापूर विधानपरिषदेची निवडणूक सध्यातरी भाजपासाठी एकतर्फी समजली जाते.आता हीच निवडणूक बिनविरोध करत इतिहास घडवण्यासाठी भाजप प्रचंड आग्रही भूमिकेत आहेत. तसे संकेतही भाजप मंत्री व सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिले आहेत.
अशातच आता सोलापूर विधान परिषदेच्या निवडणुकीत मोठा ट्विस्टआला आहे. भाजपकडून विधान परिषदेच्या सोलापूरच्या जागेवर महिलेला संधी देण्याच विचार सुरू आहे. एकनाथ शिंदेंनी राज्यसभेच्या निवडणुकीत जो धक्कातंत्राचा वापर करत तोच डाव आता विधान परिषेदच्या निवडणुकीत टाकण्याच्या तयारीत आहे.
भाजपकडून सोलापूर विधान परिषदेच्या जागेच्या उमेदवारीसाठी माजी आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, माजी आमदार प्रशांत परिचारक, राजेंद्र राऊत ,विक्रम देशमुख, शिवाजीराव सावंत यांच्या उमेदवारीसाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती आहे.
भाजप विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी महिला उमेदवार देण्याबाबत जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यात रश्मी बागल,डॉ. श्रद्धा जवंजाळ आणि राजश्री नागणे या तीन महिला नेत्यांची नावं आघाडीवर असल्याची चर्चा आहे. या तीनपैकी कोणतं नावावर शिक्कामोर्तब करायचा याचा निर्णय पालकमंत्री व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे घेणार असल्याचं बोललं जात आहे.
सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधान परिषदेच्या 616 मतांपैकी साडेचारशेपेक्षा जास्त मतं भाजप आणि महायुतीतील त्यांच्या मित्रपक्ष असलेल्या शिवसेना आणि राष्ट्रवादीकडे आहे. या तीनही पक्षांच्या मतांची सध्याचं संख्याबळ पाहता विरोधकांकडे मोजकी मतं शिल्लक राहण्याची शक्यता आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.