
Babanrao Lonikar Reacts Strongly to Online Criticism : ''कुचरवट्यावर बसून टवळक्या करणाऱ्या दहा बारा टाळक्यांना माहित नाही, त्यांच्या हातात जो मोबाईल आहे, तुमच्या बापाला पेरणीला मोदी सहा हजार रुपये देतात, तुझ्या मायची पेन्शन लोणीकरणं दिली, तुझ्या अंगावर कपडे, पायात बूटही या सरकारच्या पैशातून आला.'' अशा शब्दांत भाजपचे परतूरचे आमदार बबनराव लोणीकर यांनी त्रागा केला. तर विधानसभा निवडणुकीत कमी मतदान झाल्यावरून दोन दिवसांपुर्वीच लोणीकर यांनी तुमच्या गावाचा निधी रद्द करू का? अशी धमकी ग्रामस्थांना दिली होती.
यावरून टीकेची झोड उठली असतानाच आज(बुधवार) परतूर या आपल्याच मतदारसंघातील एका कार्यक्रमात बबनराव लोणीकर यांची जीभ बेभान सुटल्याचे दिसून आले. आपल्या वादग्रस्त विधानामुळे अनेकदा अडचणीत सापडलेल्या आमदार बबनराव लोणीकर यांच्याकडून वारंवार त्याच चुका घडताना दिसत आहेत. सोशल मीडियावर होणारी टीका जिव्हारी लागल्याने लोणीकरांनी कुचरवट्यावर टवाळक्या करणारे दहा-बारा कार्टे असा उल्लेख करत अक्षरश: त्यांच्या आई, बाप, बहीण, बायकोचा उद्धार केला.
''तुझ्या बापाला पेरणीसाठी मोदींकडून सहा हजार रुपये मिळतात, तुझ्या मायची पेन्शन या लोणीकरमुळे मिळते. तुझी आई, बहीण, बायको यांच्या खात्यात लाडक्या बहिणीचे पैसे लोणीकरमुळे जमा होतात. आमचचं खाता आणि आमच्यावरच उलटता.'', अशा शब्दात लोणीकर यांनी टीका करणाऱ्यांवर आगपाखड केली.
सध्या त्यांच्या या भाषणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. दोन दिवसापुर्वीच एका गावात रस्त्याचे भुमीपूजन करताना आपल्याला या गावातून कमी मतदान झाल्याचा राग लोणीकर यांनी भाषणातून व्यक्त केला होता.
पाच वर्षांत एकदा कमळावर फुली मागायला येतो, पण तुम्ही दगा दिला. या गावात आतापर्यंत जे आलं ते लोणीकरमुळे आणि यापुढे जे येईल तेही लोणीकरमुळेच. आता आठ कोटी रुपयांचा रस्ता गावात करतो आहे, मी तो रद्द करू शकतो?, असे सांगत लोणीकर यांनी पुन्हा असं केलं तर तुमच्या गावावर फुली मारीन, असा दमच गावकऱ्यांना भरला होता. त्यानंतर आता या नव्या वादग्रस्त विधानाने लोणीकर यांच्या अडचणीत भर पडणार असल्याचं बोललं जात आहे.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.