
Jalna Scam News : जालना जिल्ह्यातील अतिवृष्टीच्या अनुदान घोटाळ्याची व्यापती शंभर कोटी पर्यंत पोचल्याचा दावा माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी केला आहे. या घोटाळ्यातील एकही व्यक्ती सुटता कामा नये, अगदी आरडीसी, एसडीएम,तहसीलदार, मंडळ अधिकारी, तलाठी, कृषी सहाय्यक, ग्रामसेवकांसह 76 जणांवर कारवाई झाली पाहिजे.
तत्कालीन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे आमदार यांचीही या प्रकरणात चौकशी झाली पाहिजे. सीईओ, कृषि अधिकाऱ्यांनी संबंधितांवर कारवाई केली नाही, तर आम्हाला त्यांनाही सभागृहात आणावे लागेल, असा इशाराही लोणीकर (Babanrao Lonikar) यांनी दिला आहे. राज्यभरात गाजत असलेल्या अतिवृष्टी अनुदान वाटप घोटाळ्यातील आरोपींवर कारवाई व्हावी, अशी मागणी आमदार बबनराव लोणीकर यांनी सातत्याने लावून धरली आहे.
या अधिकाऱ्यांच्या मालमत्ता जप्त करा, त्यांच्या सातबाऱ्यावर बोजा टाका. सरकाच्या तिजोरीतून लुटलेला पैसा त्यांच्याकडून वसूल करा, अशी आक्रमक भूमिका लोणीकर यांनी घेतली आहे. (Jalna) दोन दिवसापुर्वी जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्यासोबत तब्बल अडीच तास चाललेल्या मॅरेथॉन बैठकीनंतर लोणीकर आता विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात हा घोटाळा मांडणार आहेत. अंबड आणि घनसावंगी तालुक्यात अतिवृष्टी अनुदान वाटप घोटाळ्यात सहभागी असलेले महसूल कर्मचारी, तलाठी, कृषी सहायक, ग्रामसेवक यांच्यासह तहसीलदार, उपविभागीय अधिकारी अशा 76 जणांना निलंबित करून त्यांच्यावर कारवाई करा.
घोटाळ्याचा आकडाही वेळोवेळी बदलत आहे. नेमका घोटाळा किती रुपयाचा आहे. हे ही जिल्हाधिकारी यांनी स्पष्ट केले पाहिजे. या घोटाळ्यात नगर आणि बीड जिल्ह्यातील लोकांच्या नावे 24 कोटी गेले आहेत. हा घोटाळा तहसीलदारांच्या संमती शिवाय झाला नाही. त्यामुळे यांच्यासह तत्कालीन आमदारांचीही चौकशी करा. या घोटाळ्याच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी, सीईओ आणि इतर चौकशी समितीसोबत बैठक झाली आहे.
घोटाळ्यात सहभागी 76 जणांवर निलंबनाची कारवाई करा. तसेच त्यांची विभागीय चौकशी लावा. या लोकांनी सरकारची तिजोरी लुटली आहे. मुख्यमंत्री, महसूलमंत्री यांना भेटून या घोटाळ्याची व्याप्ती सांगितली आहे. येणाऱ्या पावसाळी अधिवेशनात आवाज उठवणार आहे. तसेच तारांकित प्रश्नही उपस्थित केला असल्याचे लोणीकर यांनी सांगितले. राष्ट्रवादीच्या आमदाराची चौकशी झाली पाहिजे, आमच्या मतदारसंघात अशा प्रकार घडला तर आमचीही चौकशी करा, असे म्हणत लोणीकर यांनी अप्रत्यक्षरित्या माजी आमदार राजेश टोपे यांच्याकडे बोट दाखवले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.