Vidhansabha election 2024: धनंजय मुंडे ऐकत नाही; मग राजकारणात राहायचं कशाला? भाजप आमदाराची खदखद

Gevrai assembly elections 2024 BJP MLA Laxman Pawar: "एक चांगला तहसीलदार, चांगला पोलिस अधिकारी,चांगला गटविकास अधिकारी एवढेच मागितलं होतं. मात्र तेही मिळालं नाही," अशी खंत लक्ष्मण पवारांनी व्यक्त केली.
dhananjay munde
dhananjay mundeSarkarnama
Published on
Updated on

Beed News: "सध्याच्या राजकारणाला मी कंटाळलो आहे. मी जर जनतेची कामे करू शकत नसेल तर माझ्या पदाचा उपयोग काय ? माझे गाऱ्हाणे मी पक्षश्रेष्ठीपुढे मांडले आहे.वारंवार तक्रारी करण्याचा माझा स्वभाव नाही..पण तरीही सुधारणा होत नसतील तर आम्ही स्वाभिमानी आहोत," असे खडेबोल सुनावत भाजपचे आमदार लक्ष्मण पवार यांनी आगामी विधानसभा निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतला आहे.

हा निर्णय घेत असताना लक्ष्मण पवार यांनी बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर आरोप करीत त्याच्या कार्यशैलीवर आक्षेप घेतला आहे. "पालकमंत्री (धनंजय मुंडे) ऐकत नाहीत, त्यामुळे राजकारण करायचं तरी कशाला? सामाजिक काम करुन चळवळीत राहणार," असे पवार यांनी एका स्थानिक वृत्तपत्रात दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे.

"एक चांगला तहसीलदार, चांगला पोलिस अधिकारी,चांगला गटविकास अधिकारी एवढेच मागितलं होतं. मात्र तेही मिळालं नाही," अशी खंत लक्ष्मण पवारांनी व्यक्त केली. लक्ष्मण पवार यांनी अप्रत्यक्षरीत्या पालकमंत्री धनंजय मुंडे आपल्या मागण्या पूर्ण करीत नाही, असा आरोप केला आहे.

भाजपकडून सलग दोन वेळा लक्ष्मण पवार हे आमदार झाले आहेत. बीडच्या गेवराईचे ते विधानसभा सदस्य आहेत. गेल्या काही दिवसापासून ते भाजप सोडणार असल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी आपल्या मनातील खदखद व्यक्त केली आहे. "मी आणि माझ्या कुटुंबातील कोणीच आमदारकीची निवडणूक लढविणार नाही," असे सांगत राजकारणाचा कंटाळा आल्याचे त्यांनी सांगितले.

dhananjay munde
Sanjay Ghatge: ठाकरे गटाच्या माजी आमदाराला मिळाली परतफेड; पाठिंबा दिल्याने मुश्रीफांकडून मोठं 'गिफ्ट'

आमदार लक्ष्मण पवार यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांचा फोन नॉट रिचेबल आहे. आमदार लक्ष्मण पवार यांनी निवडणूक न लढण्याची निर्णय खरंच घेतला आहे का? हे त्यांच्याशी संपर्क झाल्यानंतरच समजेल. पण छापून आलेल्या बातमीमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे, हे मात्र नक्की.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com