Narayan Kuche Audio News : शेतकऱ्याचे अकाऊंट फ्रीज; भाजप आमदाराचा संताप, बँक मॅनेजरला शिवराळ भाषेत झापले!

BJP MLA Narayan Kuche allegedly threatened a bank manager over the phone after farmers' accounts were frozen : संभाषणाची आॅडिओ क्लिप समाज माध्यमांवर व्हायरल झाली आणि याची एकच चर्चा सुरू झाली. संतापाच्या भरात आपण बोलून गेलो, अशी प्रतिक्रिया आमदार नारायण कुचे यांनी दिली आहे.
BJP MLA Narayan Kuche Audio Clip News
BJP MLA Narayan Kuche Audio Clip NewsSarkarnama
Published on
Updated on

BJP News : लोकांच्या प्रश्नावर एखाद्याला जाब विचारणे, दम देणे असे प्रकार राजकारणात सातत्याने घडत असतात. त्यात तक्रारदार जर मतदारसंघातील शेतकरी असेल तर लोकप्रतिनिधी अधिकच संवेदनशील होतात. पण भावनेच्या भरात शिवराळ भाषा, दमदाटी केली जाते आणि मग अडचणी वाढतात. असाच काहीसा प्रकार भाजपाचे आमदार नारायण कुचे यांच्या बाबतीत समोर आला आहे.

पिक कर्ज थकीत असल्यामुळे शेतकऱ्याचे खाते फ्रीज करून त्यांची मुदत ठेव परत करण्यास नकार देणाऱ्या यूनियन बँकेच्या व्यवस्थापकाला बदनापूरचे आमदार नारायण कुचे (Narayan Kuche) यांनी फोनवरून चांगलाच दम भरला. शिवीगाळ करत झालेल्या या संभाषणाची आॅडिओ क्लिप समाज माध्यमांवर व्हायरल झाली आणि याची एकच चर्चा सुरू झाली. संतापाच्या भरात आपण बोलून गेलो, अशी प्रतिक्रिया आमदार नारायण कुचे यांनी दिली आहे.

जामखेड येथिल युनियन बँक आँफ इंडियाचे शाखा व्यवस्थापक ललित शिरलेकर यांनी भोकरवाडी येथिल शेतकरी यांच्या मुदत ठेवीची रक्कम पिक कर्जाचे खाते एनपीए असल्याच्या कारणाने देण्यास असमर्थता दर्शवली होती. (BJP) या संदर्भात आमदार नारायण कुचे यांनी यापूर्वीही संबंधित शाखा व्यवस्थापकांना फोन केला होता. परंतु ते आपल्या हातात नाही, आपण मुख्य कार्यालयाला कळवले असल्याचे त्यांनी सांगितले होते.

BJP MLA Narayan Kuche Audio Clip News
Narayan Kuche News : बबनराव लोणीकरांच्या एका फोनवर मी जिल्हाध्यक्ष झालो! नारायण कुचेंकडून स्तुतीसूमने!

याशिवाय जामखेड येथिल रोहित सोनाजी धुळे यांनी बँकेकडे ग्राहक सेवा केंद्र मिळावे यासाठी अर्ज केला होता. त्यासाठीही नारायण कुचे यांनी व्यवस्थापक शिरलेकर यांना फोन केला होता. वारंवार फोन करून शेतकऱ्याची मुदत ठेव आणि धुळे यांना ग्राहक सेवा केंद्र देण्यास टाळाटाळ केली जात असल्याने कुचे यांचा पारा चढला. त्यानंतर कुचे यांनी बँक व्यवस्थापकास भ्रमणध्वनीवरून शिवीगाळ केली. तुमच्या मुजोरीमुळे शेतकरी आत्महत्या करत आहेत, मी बँकेत येऊ का? असे म्हणत धमकावले.

BJP MLA Narayan Kuche Audio Clip News
Jalna Shetkari Audan News : शेतकरी अनुदानात 100 कोटींचा घोटाळा?, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा आरोप

दरम्यान, या संदर्भात कुठलीही तक्रार दाखल करण्यात आलेली नाही. बँक व्यवस्थापक सिरलेकर यांच्याशी संपर्क केला असता,त्यांनी प्रतिसाद दिला नाही. तर आमदार नारायण कुचे यांनी मी यापुर्वीही व्यवस्थापक यांना दोन-तीन वेळा शेतकऱ्याच्या तक्रारीवरुन संपर्क केला होता. बँक व्यवस्थापकाने शेतकऱ्याचे बचत खाते होल्ड करून अडवणुक केली. यामुळे रागाच्या भरात मी व्यवस्थापक यांना बोललो,असे सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com