Narayan Kuche News : बबनराव लोणीकरांच्या एका फोनवर मी जिल्हाध्यक्ष झालो! नारायण कुचेंकडून स्तुतीसूमने!

MLA Narayan Kuche expresses gratitude towards Babanrao Lonikar, revealing how a single phone call led to his appointment as District President. : रावसाहबे दानवे यांचे पक्षातील कट्टर विरोधक म्हणून जिल्ह्याला परिचित असलेल्या माजी मंत्री बबनराव लोणीकर यांच्याशी जवळीक वाढवत कुचे यांनी वेगळीच खेळी केली.
Narayan Kuche-Babanrao Lonikar-Raosaheb Danve News
Narayan Kuche-Babanrao Lonikar-Raosaheb Danve NewsSarkarnama
Published on
Updated on

Jalna BJP Political News : जालना जिल्ह्यातील बदनापूर विधानसभा मतदारसंघातून दोन वेळा निवडून आलेले विद्यमान भाजप आमदार नारायण कुचे यांनी एका मेळाव्यात माजी मंत्री बबनराव लोणीकर यांच्यावर स्तुतीसुमनं उधळली. लोणीकरांनी एक फोन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केला आणि मी जिल्हाध्यक्ष झालो, असे कुचे यांनी जाहीरपणे सांगितले. जिल्ह्याच्या राजकारणात माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळख असलेल्या नारायण कुचे यांनी लोणीकरांचे कौतुक केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या गेल्या आहेत.

नारायण कुचे (Narayan Kuche) यांचा राजकारणातला उदयच मुळात रावसाहेब दानवे यांच्यामुळे झाल्याचे बोलले जाते. बदनापूर या राखीव मतदारसंघातून भाजपला जेव्हा उमेदवार मिळत नव्हता तेव्हा रावसाहेब दानवे यांनी छत्रपती संभाजीनगर महापालिकेत नगरसेवक असलेल्या नारायण कूचे यांना बदनापूरमधून विधानसभेची उमेदवारी दिली. एवढेच नाही तर पहिल्याच फटक्यात निवडून आणत कुचेंना आमदारही केले. रावसाहेब दानवे यांचा प्रत्येक शब्द प्रमाण मानणाऱ्या नारायण कुचे यांचे गेल्या काही दिवसांपासून सूर बदलल्याचे चित्र आहे.

रावसाहबे दानवे यांचे पक्षातील कट्टर विरोधक म्हणून जिल्ह्याला परिचित असलेल्या माजी मंत्री बबनराव लोणीकर (Babanrao Lonikar) यांच्याशी जवळीक वाढवत कुचे यांनी वेगळीच खेळी केली. जालना ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष पद मिळवण्यासाठी नारायण कुचे यांनी थेट रावसाहेब दानवे यांच्याशीच पंगा घेतल्याचे बोलले जाते. रावसाहेब दानवे यांनी या पदासाठी दिलेल्या उमेदवारापेक्षा जास्त मतं मिळवत कुचे यांनी बाजी मारली. पण या मागे माजी मंत्री बबराव लोणीकर यांचा हात होता, हे ही स्पष्ट झाले.

Narayan Kuche-Babanrao Lonikar-Raosaheb Danve News
MLA Narayan Kuche News: कुचेंचे नशीब कराडांपेक्षा भारी, साडेसात कोटींच्या म्हाडाच्या घराची लाॅटरी..

रावसाहेब दानवे समर्थक उमेदवाराला धोबीपछाड देत जिल्हाध्यक्ष पद मिळवल्यानंतर नारायण कुचे यांनी रावसाहेब दानवे यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेटही घेतली. दानवे यांनी त्यांचे अभिनंदन करत त्यांचा सत्कार केला असला तरी कुचे-दानवे यांच्यात कटुता निर्माण झाल्याचे चित्र आहे. कुचे यांना जिल्ह्यातून बबनराव लोणीकर, शिवसेनेचे आमदार अर्जून खोतकर, हिकमत उढाण यांचीही साथ मिळताना दिसत आहे. तर राज्य पातळीवर वरिष्ठ नेत्यांचाही कुचे यांना जिल्ह्याच्या राजकारणात आशिर्वाद लाभत असल्याची चर्चा आहे.

Narayan Kuche-Babanrao Lonikar-Raosaheb Danve News
Babanrao Lonikar-Raosaheb Danve : मी अन् रावसाहेब दानवेंनी ठरवलं तर जालना महापालिका ताब्यात घेऊ शकतो! लोणीकरांचा दावा..

परतूरमध्ये झालेल्या पक्षाच्या एका मेळाव्यात नारायण कुचे यांनी जिल्हाध्यक्ष झाल्यानंतर केलेल्या भाषणाची सध्या जिल्ह्यात जोरदार चर्चा सूर आहे. यावेळी बबनराव लोणीकर, राहूल लोणीकर यांच्या उपस्थितीत कुचे यांनी आपण बबनराव लोणीकर यांच्या एका फोनवर जिल्हाध्यक्ष झाल्याचे सांगितले.

Narayan Kuche-Babanrao Lonikar-Raosaheb Danve News
Pankaja Munde यांना निवेदन द्यायला आला, Jalna Police ने शेतकऱ्याला जमिनीवर पाडलं, Gajanan Ugale |

लोणीकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक फोन केला. नारायण कुचे यांना आपल्याला जिल्हाध्यक्ष करायचे आहे असे सांगितले आणि मुख्यमंत्र्यांनी लोणीकरांना मी तुमच्या शब्दाच्या बाहेर नाही, असे सांगत मला जिल्हाध्यक्ष केले. परतूर तालुक्याचा विकास लोणीकर यांनीच केला, मोठ्या प्रमाणात त्यांनी निधी आणला, असेही कुचे यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com