MLA Rajesh Pawar News : आमदार राजेश पवार यांची सटकली; उपनिबंधकाला शिवीगाळ ऑडिओ व्हायरल, पण म्हणतात तो मी नव्हेच!

BJP MLA Rajesh Pawar is caught verbally abusing the Deputy Registrar in a leaked audio clip : तुम्हाला पैशाची मस्ती असून सेवानिवृत्त होत असल्याने पैसे घेऊन शासनाविरोधात कृत्य करत आहात. तुम्ही लाचारीचे पैसे घेऊन शासनाची फसवणूक करत असून तुम्हाला भर चौकात मारू.
BJP MLA Rajesh Pawar Threat Audio News
BJP MLA Rajesh Pawar Threat Audio NewsSarkarnama
Published on
Updated on

Nanded BJP : नायगाव विधानसभेचे भाजप आमदार राजेश पवार यांनी जिल्हा उपनिबंधकाला अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केल्याची आॅडिओ क्लीप समाज माध्यमांवर व्हायरल झाली आहे. नरसी सोसायटीवर प्रशासक नियुक्ती आणि शिक्षक पतपेढीतील जागा भरल्याच्या कारणावरून आमदार पवारांचा पारा चढला होता. पैसे खाऊन नियुक्त्या करून तु कुठे जाणार आहेस, अमेरिकेत जाणार आहेस का? तुला भर चौकात मारू, अशी धमकी या कथित आॅडिओमध्ये आमदार पवार जिल्हा उपनिबंधकाला देत आहेत.

विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरु असतानाच सत्ताधारी पक्षाच्या आमदारांकडून धमकावणे, मारहाण करण्याचे प्रकार समोर येत असतानाच त्यात भाजप आमदार राजेश पवारांची आता भर पडली आहे. (Nanded) नायगाव तालुक्यातील नरसी सोसायटीवर प्रशासक नियुक्त करण्याच्या प्रकरणातून हा प्रकार घडल्याचे सांगितले जाते. उपनिबंधक अशोक भिल्लारे यांना शिवीगाळ करत मी जसे सांगतो तसेच झाले पाहिजे, असा दम पवार यांनी भरला आहे.

आमदार पवार फोनवर बोलण्याआधी मुखेडचे आमदार तुषार राठोड यांनी जिल्हा उपनिबंधक भिल्लारे यांना तालुका निबंधक (ए.आर) चे पद रिक्त असून ते मला बोलल्याशिवाय नियुक्त करू नका, असा दम दिला. (BJP) तसेच शिक्षकांच्या पतपेढीत रिक्त असलेली जागा परस्पर भरून घेतल्याबद्दल मी मुख्यमंत्र्याकडे तक्रार करणार असल्याचे राठोड यांनी सांगितले. तुम्ही केलेल्या नियुक्त्या नियमबाह्य असून माझ्या मतदारसंघात नियुक्त्या करताना मला विचारल्याशिवाय करू नका, असे आमदार राठोड यांनी भिल्लारे यांना बजावले.

BJP MLA Rajesh Pawar Threat Audio News
MLA Rajesh Patil Audio Clip Viral : दीड वर्षापूर्वीची क्लिप व्हायरल करून राष्ट्रवादी आमदाराला अडचणीत आणण्याचा डाव कोणाचा?

त्यानंतर राठोड यांनी आमदार पवार यांच्याशी बोला म्हणत फोन त्यांच्याकडे दिला. त्यानंतर पवार यांनी भिल्लारे यांच्यावर शिव्यांचा अक्षरश: पाऊसच पाडला. तुम्हाला पैशाची मस्ती असून सेवानिवृत्त होत असल्याने पैसे घेऊन शासनाविरोधात कृत्य करत आहात. तुम्ही लाचारीचे पैसे घेऊन शासनाची फसवणूक करत असून तुम्हाला भर चौकात मारू, अशी धमकी पवार यांनी दिली. तुम्ही कुठले आहात असा सवाल करत जालना जिल्हा जवळच आहे, तुम्हाला माणसं पाठवून गाडीत टाकून आणायला किती वेळ लागेल? असेही पवार या आॅडिओत धमकावत आहेत.

BJP MLA Rajesh Pawar Threat Audio News
BJP Politics : भाजप अजूनही लोकसभेच्या धक्क्यात; सर्वात मोठ्या राज्यात सतावतोय विरोधकांचा तो ‘फॉर्म्यूला’

मला बदनाम करण्याचा डाव..

दरम्यान, ही कथित आॅडिओ क्लीप समाज माध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर व्हायरल झालेली रेकाँर्डिंग माझी नसून माझ्या आवाजात कोणीतरी खोडसाळपणा करून मला बदनाम करण्याचा प्रयत्न केला असल्याचा दावा आमदार राजेश पवार यांनी केला आहे. याबाबात मी अधिक चौकशीसाठी पोलिस ठाणे तसेच पोलिस अधीक्षक यांच्याकडे तक्रार केल्याचे त्यांनी सांगितले.

BJP MLA Rajesh Pawar Threat Audio News
Pratap Patil Chikhlikar News : राष्ट्रवादीत नाराजी नाट्य, चिखलीकरांनी विश्वासात घेतले नाही म्हणत खतगावकर निघून गेले!

पोलिसांत तक्रार करणार नाही.. पण

तर विधानसभेत जनतेचे प्रश्न मांडणाऱ्या लोकप्रतिनिधी आमदारांना असे अश्लिल भाषेत बोलायला शोभत नाही. मला आमदार तुषार राठोड यांनी फोन लावला, त्यानंतर त्यांच्याच मोबाईलवरून आमदार राजेश पवार यांनी अश्लिल शिविगाळ करत जिवे मारण्याची धमकी दिली. मी जालना जिल्ह्यातला असून इथल्या राजकारणाशी माझा काय संबध. तरीही मला शिविगाळ करून धमकी दिली, याप्रकरणी मी पोलिसांत गुन्हा दाखल करणार नाही. पण, माझ्या सुरक्षेसाठी मी जिल्हाधिकारी आणि पोलिस अधीक्षक यांच्याकडे अर्ज देणार असल्याचे जिल्हा उपनिबंधक अशोक भिल्लारे यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com