MLA Rajesh Patil Audio Clip Viral : दीड वर्षापूर्वीची क्लिप व्हायरल करून राष्ट्रवादी आमदाराला अडचणीत आणण्याचा डाव कोणाचा?

Kolhapur Politics : चंदगड आगारातील एका अधिकाऱ्याला झालेल्या मारहाणीसंदर्भात शिवसेनेच्या एका पदाधिकाऱ्याशी आपण हे संभाषण केलेलं आहे.
MLA Rajesh Patil
MLA Rajesh Patil Sarkarnama

Kolhapur News : कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगडचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राजेश पाटील यांची वर्षभरापूर्वीची ऑडिओ क्लिप आता व्हायरल होत आहे. पोलिसांना अपशब्द वापरलेले पाटील यांची ऑडिओ क्लिप वर्षभरानंतर का आणि कोण व्हायरल करत आहे, असा सवाल उपस्थित होत आहे. या क्लिपच्या माध्यमातून आमदार पाटील यांना आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अडचणीत आणण्याचा विरोधकांचा डाव तर नाही, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित आहे. (Chandgarh's NCP's MLA Rajesh Patil's clip from a year and a half ago went viral)

दरम्यान, हेतुपुरस्सर विरोधकांकडून केवळ बदनामी करण्याचा प्रयत्न सुरू आहे, असे आमदार राजेश पाटील यांनी ‘सरकारनामा’शी बोलताना सांगितले. आमदार राजेश पाटील हे सध्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटात आहेत. या व्हायरल ऑडिओ क्लिपसंदर्भात आमदार राजेश पाटील यांच्याशी चर्चा केली असता, त्यांनी हे संभाषण वर्ष ते दीड वर्षापूर्वीच असल्याचे सांगितले.

MLA Rajesh Patil
Ramesh Kadam In Mohol : माजी आमदार रमेश कदमांसाठी मनसेच्याही स्वागत पायघड्या; मोहोळ मतदारसंघात उद्या ८ वर्षांनंतर येणार...

चंदगड आगारातील एका अधिकाऱ्याला झालेल्या मारहाणीसंदर्भात शिवसेनेच्या एका पदाधिकाऱ्याशी आपण हे संभाषण केलेलं आहे. ही ऑडिओ क्लिप मॉर्फ केली असल्याचंही त्यांचं म्हणणं आहे. रागाच्या भरात एक आक्षेपार्ह शब्द माझ्याकडून गेला आहे, अशी कबुलीही आमदार पाटील यांनी दिली.

आपण चंदगड विधानसभा मतदारसंघात गेल्या चार वर्षांत केलेल्या विकासकामांसमोर विरोधकांना मुद्दे नसल्यामुळे असे प्रकार आता केले जात आहेत. लोकप्रतिनिधी म्हणून राजेश पाटलांची प्रतिमा अधिकारी आणि सर्वसामान्य जनतेमध्ये चांगली आहे. पण, ही प्रतिमा मलिन करण्याचा डाव विरोधकांचा आहे. व्हायरल करणाऱ्यांनी पूर्ण ऑडिओ क्लिप व्हायरल केलेली नाही. केवळ माझी बदनामी करण्याच्या हेतूने हा उद्योग केला असल्याचा आरोप राजेश पाटील यांनी केला आहे.

MLA Rajesh Patil
Malegaon Sugar Factory : अजितदादांनी शब्द खरा केला; ‘माळेगाव’चे अध्यक्ष तावरेंऐवजी केशवराव जगताप झाले...

चंदगड मतदारसंघातील कोणत्याही अधिकाऱ्याला आजपर्यंत आपण एकही चुकीचे काम करण्यासाठी फोन केला नाही अथवा त्यांच्याशी चुकीचं वागलो नाही, असा खुलासाही आमदार पाटील यांनी केला आहे.

MLA Rajesh Patil
Konkan Politics : दापोलीत भाजप कदमांना साथ देईल; पण राष्ट्रवादीचे कार्यकर्ते वाद विसरतील काय?

काय आहे ऑडिओ क्लिपमध्ये?

दीड वर्षापूर्वीची ऑडिओ क्लिप आता कोणी बाहेर काढली, असा प्रश्नही चंदगडमध्ये चर्चिला जात आहे. त्या क्लिपमध्ये आमदार पाटील आणि एका शिवसेना कार्यकर्त्यामधील संभाषण आहे. आमदार पाटील यांनी पोलिसांना एक शिवी दिली आहे. ते पुढे म्हणतात की, पोलिसांना आईबाप नसतात. कुणाकडूनही पैसे घेतात आणि बाजू घेतात. अशा पद्धतीची आमदार राजेश पाटील यांची ही कथित कॉल रेकॉर्डिंग सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

MLA Rajesh Patil
Ram Shinde Secret Explosion : रोहित पवारांनी २०१९ मध्ये चंद्रकांतदादांना भेटून हडपसरमधून भाजपचे तिकिट मागितले होते; राम शिंदेंचा गौप्यस्फोट

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com