Suresh Dhas interview : पत्रकार विलास बडेंबद्दल केलेलं वक्तव्य अनावधानाने; सुरेश धस यांचं घुमजाव

BJP MLA Suresh Dhas interview accidentally mentioned journalist Vilas Bade murder conspiracy : भाजप आमदार सुरेश धस यांनी बिश्नोई गँगकडून हत्येचा कटाचा दावा करताना मुलाखतीत पत्रकाराचे नाव अनावधानाने घेतल्याची प्रतिक्रिया दिली आहे.
Suresh Dhas
Suresh Dhas sarkarnama
Published on
Updated on

Maharashtra politics news : खोक्या प्रकरणावरून बिश्नोई गँगच्या माध्यमातून हत्येचा कट रचण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप करत आमदार सुरेश धस यांनी एकच खळबळ उडवून दिली.

'सरकारनामा'ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी पत्रकार विलास बडे यांच्या नावाचा उल्लेख केला होता. त्यानंतर ही बाब प्रचंड व्हायरल झाली. मात्र पत्रकार विलास बडे यांनी बेछूट आणि बेसलेस आरोपांनंतर अब्रुनुकसानीचा दावा दाखल करण्याचा इशारा देताच, सुरेश धस यांनी घुमजाव केल आहे. मुलाखतीत विलास बडेंचा उल्लेख अनावधानाने झाला होता. त्यांचा या प्रकरणाशी काहीही संबंध नसल्याचं स्पष्टीकरण आमदार सुरेश धस यांनी केला.

भाजप (BJP) आमदार सुरेश धस यांनी पत्रकार विलास बडे यांच्या नावाविषयी दिलगिरी व्यक्त केली आहे. मुलाखतीत विलास बडेंचा उल्लेख अनावधानाने झाला. पण त्यांचा या प्रकरणाशी कोणताही संबंध नाही, असे आमदार धस यांनी स्पष्टीकरण दिले आहे. तसा व्हिडिओ देखील समाज माध्यमांवर पोस्ट केला आहे.

Suresh Dhas
BJP vs Shiv Sena : उद्धव सेना 20वर का आली; आमदार फुकेंनी लगावला टोला...

भाजप आमदार सुरेश धस यांनी 'सरकारनामा'ला दिलेली मुलाखत चांगलीच विस्फोटक झाली. या मुलाखतीत त्यांनी एका वळणावर त्यांच्या हत्येचा (Crime) कटाविषयी धक्कादायक विधान केले. हे विधान करताना, त्यांनी बिश्नोई गँगशी संबंध जोडल्याने खळबळ उडाली होती.

Suresh Dhas
Top 10 News : गर्भवती मृत्यू प्रकरणात मंगेशकर रुग्णालय अडचणीत, अमित शाहंनी स्विकारले 260 मृत्यूचे सत्य, महाराष्ट्रात भाजपची ऐतिहासिक कामगिरी - वाचा टॉप न्यूज एका क्लिकवर

मुलाखतीत म्हटले होते की, 16 वर्षे मी माळकरी राहिलो, आता डॉक्टरच्या सल्ल्याने मांसाहार करतो. पण अजून हरणाचं मांस खाण्यापर्यंत गेलेलो नाही. इथं माझ्यावर हरणाचं मांस खाल्ल्याचा आरोप करून नंतर त्यांनी बाहेरच्या राज्यातून विमानाची तिकिटं काढून बिश्नोई समाजाची काही लोकं आणल्याचा दावा केला होता.

याने हरणाचं मांस खाल्लंय, असं सांगून बिश्नोई समाजात मला व्हिलन करण्याचा त्यांचा प्लॅन होता आणि त्यातून लॉरेन्स बिश्नोईने माझी हत्या करावी, असा कट रचण्यात होता, असे आमदार धस यांनी म्हटले होते. या कटात दोन पत्रकार असल्याचा दावा केला होता. पण त्यात चुकून विलास बडे यांच्या नावाचा उल्लेख केला असल्याचे स्पष्टीकरण आता आमदार धस यांनी दिले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com