
Waqf Bill controversy : उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी सत्तेसाठी हिंदुत्व सोडले. भाजपसोबतची युती तोडून महायुतीत सहभागी झाले. त्यांनी काँग्रेसच्या पावलावर पाऊल ठेवून वाटचाल सुरू केली आहे.
आता वक्फ विधेयकाला विरोध करून उद्धव सेनेने बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांनाही तिलांजली दिल्याचे स्पष्ट झाले आहे. याच कारणामुळे 56 आमदारांची उद्धव सेना 20वर आली असल्याचा टोला भाजपचे आमदार परिणय फुके यांनी लगावला.
वक्फ विधेयकावर इंडिया आघाडीच्या बाजूने मतदान केल्याने भगवा खाद्यांवर घेऊन मिरवणाऱ्या कट्टर शिवसैनिकांना धक्का बसला आहे. हिंदुत्व (Hindu) सोडणाऱ्या उद्धव ठाकरे यांना याची मोठी राजकीय किंमत भविष्यात चुकवावी लागणार असल्याचे दिसून येते. वक्फ विधेयक मुस्लिमांच्या विरोधात नाही. हे स्पष्ट करताना आमदार परिणय फुके यांनी काँग्रेसच्या कार्यकाळात कायद्यात बदल करून वक्फ बोर्डाला असिमित अधिकार देण्यात आले होते, ते काढून घेतल्याचे सांगितले.
मोदी सरकारच्या विधेयकानुसार त्यावर नियंत्रण येणार आहे. शेतकऱ्यांच्या (Farmer) जागेवर हक्क दाखवला तर अपील करण्याची परवानगी त्यांना मिळणार आहे. कोर्टातही दाद मागता येणार आहे. सरकारी जागा बळकावण्याचे बेकायदेशीर कामेही यापूर्वी झाली होती. या सर्वावर आता रोख लागणार आहे. या विधेयकाला काँग्रेसचा विरोध करणारच होती. मात्र उद्धव ठाकरे यांच्या सेनेकडून ही अपेक्षा नव्हती, असे परिणय फुके यांनी म्हटले.
बाळासाहेब ठाकरे यांनी म्हटले होते की, काँग्रेस बरोबर जाणार नाही. वक्फ बोर्डालाही त्यांनी विरोध केला होता. मात्र उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या विचारासोबतच हिंदुत्वही आता कायम सोडल्याचे दिसून येते. संजय राऊत काय बोलतात याचे त्यांना भान राहात नाही. केवळ आरोप करतात. तेसुद्धा कन्फ्युज आहे. ठाकरे सेनेबद्धल लोकांचे मत खराब होत चालेल असल्याचेही आमदार फुके यांनी सांगितले.
भंडारा-गोंदिया जिल्ह्याच्या स्थानिक स्वराज्य संस्थेचे नेतृत्व करणाऱ्या आणि साकोलीतून विधानसभा निवडणूक लढणाऱ्या फुके यांनी मालगुजारी तवालाच्या मुद्दा लवून धरला होता. या वेळी त्यांच्या मागणीनुसार राज्यच्या अर्थसंकल्पात आर्थिक तरतूद करण्यात आली आहे. गोंड राज्यांच्या कार्यकाळात कोळी समाजाने मालगुजारी तलावाची निर्मिती करून भंडार, गोंदिया जिल्ह्यात मोठी सिंचनाची सुविधा उपलब्ध करून दिली होती. याच तलावांमुळे हे दोन्ही जिल्हे धान उत्पादक झाले आहेत. मात्र सातत्याने दुर्लक्ष केल्याने या तलावांची अवस्था खराब झाली आहे. गाळ साचल्याने सिंचन क्षमताही आटली आहे. आता राज्य सरकारने जीआर काढला असल्याने रॉयल्टी मुक्त खोलीकरण केले जाणार आहेत. यातून पुन्हा भंडारा-गोंदिया जिल्ह्यात पुन्हा सिंचनाची क्षमता निर्माण होणार असल्याचे परिणय फुके यांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.