
Maharashtra wildlife crime : भाजप आमदार सुरेश धस यांचा निकटवर्तीय सतीश भोसले ऊर्फ 'खोक्या', याचे एक-एक कारनामे समोर येऊ लागले आहेत. बॅटने मारहाणी केल्याचा व्हिडिओ समोर आल्यापासून, त्याची परिसरातील दहशत चर्चेत आली आहे. तसेच नोटांचा बंडलांशी खेळताना व्हिडिओ समोर येऊ लागले आहेत.
याशिवाय परिसरात असलेल्या डोंगराळ भागात त्याने केलेल्या हरिण, मोर, ससे, काळवीट यांच्या शिकारीचे किस्से समोर आले आहेत. बीड पोलिसांची दोन पथकं मागावर असतानाच, त्या वन विभागाचे पथक देखील वन्यप्राण्यांची शिकार केली म्हणून मागावर लागलं आहे. वन विभागाने त्याच्याविरोधात स्वतंत्र गुन्हा नोंदवण्याची तयारी केली आहे.
सतीश भोसले याने दोन दिवसांपूर्वी बॅटने मारहाण केल्याचा व्हिडिओ समाज माध्यमांवर चांगलाच व्हायरल झाला. यानंतर तो भाजप (BJP) आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता निघाला. यामुळे बीडमधील राजकीय गुन्हेगारी पुन्हा चर्चेत आली आहे. सतीश भोसले हा पसार असून, त्याच्या मागावर पोलिस पथक आहे.
दरम्यान, सतीश भोसले याची परिसरातील दहशत आता एका-एका व्हिडिओच्या माध्यमातून समोर येऊ लागली आहे. पैशांच्या बंडलांबरोबर त्याचा व्हिडिओ समोर आले आहेत. तसेच बीडमधील (BEED) शिरूर, बावी इथल्या डोंगराळ भागात तो हरण, काळवीट, ससे, मोर अशा वन्यप्राण्यांची शिकार करायचे हे देखील समोर आले. 200 पेक्षा जास्त वन्यप्रमाण्यांची त्याने शिकार केल्याचे सांगितले जात आहे. शिकारीला विरोध करणाऱ्यांना तो टोळक्याने जाऊन मारहाण करायचा, हे देखील समोर आले आहे.
वन विभागाने या प्रकाराची गंभीर दखल घेतली, असून त्याविरोधात स्वतंत्र गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू केली आहे. यासाठी शिकार केलेल्या ठिकाणी वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी तपासणी केली. काही ठिकाणी शिंग, हाड देखील सापडली आहेत. शिकारीसाठी ज्या ठिकाणी जाळ लावयचा, ते ठिकाणं देखील स्थानिकांनी दाखवले आहेत. त्यामुळे सतीश ऊर्फ खोक्याविरुद्ध वनविभागाने कारवाईचा फास आळणार असल्याचे संकेत दिले आहे.
सतीश भोसले याला हरणाच्या शिकारीचा विरोध केला म्हणून, महेश ढाकणे आणि दिलीप ढाकणे या पिता-पुत्रांना गंभीर मारहाण केली होती. दिलीप ढाकणे यांना एवढी जबर मारहाण केली की, त्याचे आठ दात पाडले. त्यांचा मुलगा महेश ढाकणे यांचा पाय कायम स्वरूपी जायबंदी केला आहे. सतीश भोसले हा बेपत्ता असून, त्याच्या शोध घेण्यासाठी पोलिसांनी दोन पथक मागावर आहेत. आता वन विभागाने सतीश भोसलेविरोधात स्वतंत्र कारवाईचे संकेत दिले आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.