Chitra Wagh : चित्रा वाघांनी दरेकर आणि लाडांचा ‘गेम’ केला अन् आंदोलनाचा ताबा घेतला

BJP Maharashtra Legislative Council Pravin Darekar Prasad Lad Chitra Wagh : विधान परिषदेमधील आगामी नेतृत्वासाठी भाजपच्या प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांच्याबरोबर चित्रा वाघ यांचे नाव चर्चेत आले आहे.
Chitra Wagh 1
Chitra Wagh 1Sarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Legislative Council : विधान परिषदेतील बडे नेते असलेले भाजपच्या प्रवीण दरेकरांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाचे अनिल परबांविरोधातील आंदोलनाचे नेतृत्व केले पण, घोषणाबाजी करीत चित्रा वाघ यांनी हे आंदोलन ताब्यात घेतले आणि सकाळीच आपला आवाज घुमवला.

पुढच्या काळात चित्रा वाघ विधान परिषदेत नेतृत्व करणार? अशी चर्चा आता भाजप अंतर्गत सुरू झाली आहे. यातून विधान परिषदेच्या नेतृत्वासाठी इच्छुक असलेल्या प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांच्याबरोबर चित्रा वाघ देखील टशन देताना दिसत असल्याचे भाजपमध्ये पक्षातंर्गत कुरघोड्यांचे राजकारण रंगू लागले आहे.

सत्ताधारी भाजपची, विधान परिषदेत मोठी ताकद आहे. विधान परिषद देवेंद्र फडणवीसांना (Devendra Fadnavis) आपल्या जवळचे आणि सत्ताकांक्षी नेत्यांना विधान परिषदेवर घेतले आहे. माजी विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, प्रसाद लाड, सदाशिव खोत, श्रीकांत भारती, परिणय फुके, निरंजन डावखरे अशा अनेक नव्या-जुन्या दमाचे नेते आहेत. या नेत्यांमध्ये नेतृत्वासाठी स्पर्धा आहे. फडणवीसांच्या ताकदीने दरेकर हेच विधानपरिषदेचे नेतृत्व करतात. पुढच्या काळात विधानपरिषदेत नेहमीच चर्चा असते. त्यात परिषदेतील जुने नेते दरेकर आणि लाड यांच्यात राजकीय दृष्ट्या 'टशन' देण्यासाठी स्पर्धा असते.

Chitra Wagh 1
University Degree Certificate Mistake : विद्यापीठाच्या बोधचिन्हावरील स्पेलिंग चुकले; नाचक्कीनंतर चार उपकुलसचिवांवर कारवाईचा बडगा

काही महिन्यापूर्वी परिषदेची आमदारकी मिळालेल्या चित्रा वाघ आक्रमक नेत्या म्हणून ओळखल्या जातात. भाजप (BJP) पक्ष संघटनेबरोबरच, सत्तेच्या त्यांचा मोठा दबदबा आहे. संघटनेपासून सत्तेत राहून विरोधकांवर टीका करण्याची एकही संधी त्या सोडत नाही. सत्ता असो वा, नसो, एक आक्रमक चेहरा म्हणून आपली ओळख चित्रा वाघ निर्माण यांनी केली आहे. वाघ या विधान परिषदेत आल्यापासून नागपूरच्या हिवाळी अधिवेशन आणि आता मुंबईतील अर्थसंकल्पीय अधिवेशनात त्या आक्रमकपणे सहभागी झाला आहे.

Chitra Wagh 1
Midnight birthday celebration police : संतापजनक! 'खाकी वर्दी'तील रक्षणकर्त्याचं गुन्हेगारांसोबत मध्यरात्री जंगी बर्थ-डे सेलिब्रेशन

छाप पाडणे, हे त्यांची खासियत आहे. अधिवेशनाच्या पहिल्या आठवड्यात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलाच वादंग होताना पाहिला मिळाला. सत्ताधारी अन् विरोधक एकमेकांना जशास तसे उत्तर देत आहेत. गुरूवारी शिवसेनेचे नेते आमदार अनिल परब यांनी संभाजी महाराज यांच्याशी तुलना केल्याचा आरोप करताना सत्ताधाऱ्यांनी सभागृह डोक्यावर घेतले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी हाच मुद्दा घेऊन सत्ताधारी विधानसभेच्या पायऱ्यांवर परबांविरोधात आंदोलन केले.

प्रवीण दरेकरांच्या नेतृत्वात होणारे या आंदोलनाला चित्रा वाघ यांनी अगोदर पोचल्या. पायऱ्यांवर येत चित्रा वाघ यांनी दरेकर आणि लाड यांच्याशी चर्चा करत आंदोलनाचे नियोजन केले. आणि आंदोलनात दरेकर यांच्या शेजारी बसून जोरदार घोषणाबाजी केली. अर्थात, या आंदोलनचे नेतृत्व दरेकरांकडे असले, तरी घोषणाबाजी करीत वाघांनी आंदोलनाचा ताबा घेतला, आणि विधान परिषदेच्या भावी नेतृत्वाच्या चर्चेला तोंड फुटले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com