Suresh Dhas : हाके, शेंडगेंना आमदार धस यांनी ठणकावलं; 'हे तुमचं चाललंय, ते बरोबर नाय, हे धंदे बंद करा'

BJP MLA Suresh Dhas OBC Laxman Hake Prakash Shendge march in Dharashiv Beed Santosh Deshmukh Parbhani Somnath Suryawanshi : धाराशिव इथं काढलेल्या जनआक्रोश मोर्चात भाजप आमदार सुरेश धस यांनी लक्ष्मण हाके आणि प्रकाश शेंडगे यांना चांगलच ठणकावलं.
Suresh Dhas 4
Suresh Dhas 4Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : धाराशिव इथं काढण्यात आलेल्या जनआक्रोश मोर्चात, भाजप आमदार सुरेश धस यांनी ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि प्रकाश शेंडगे यांच्यावर निशाणा साधला.

"आम्ही सर्व एकत्र आहोत. तुम्ही हे धंदे बंद करा, अशी माझी विनंती आहे. पण बोलायचे असेल तर, बोला. काय बोलायचे असेल ते बोला. आम्ही तुम्हाला उत्तर देणार नाही. हे तुमचं चाललं आहे, हे बरोबर नाही", अशा शब्दात आमदार धस यांनी या दोघांना ठणकावलं.

बीड (BEED) मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी आणि परभणीमधील सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूप्रकरणी धाराशिवमध्ये काढण्यात आलेल्या जनआक्रोश मोर्चात, आमदार सुरेश धस यांनी मंत्री धनंजय मुंडे यांची बाजू घेणारे ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि प्रकाश शेंडगे यांना चांगलच सुनावलं.

Suresh Dhas 4
Suresh Dhas : ड्रग्स तस्करींमधील गुन्हेगारांबरोबर 'मेन आकां'चा दाखवला फोटो; आमदार धस यांनी मंत्री मुंडेंच्या अडचणी वाढवल्या

'लक्ष्मण हाकेसाहेब यांच्या पाया पडतो. कोणाचीही उचल उचलू घेऊन कोणीकडे बोलत जाऊ नका. आई शपथ, तुम्हाला विनंती आहे. तुम्हाला पाचशे मतं पडले आहे की, पाच हजार. हाके साहेब, उचल हा शब्द वेगळा वाटत असेल, तर मागे घेतो. पण कोणाच्याही सांगण्यावर काही बोलत जाऊ नका', असे भाजप (BJP) आमदार धस यांनी म्हटले. यानंतर त्यांनी प्रकाशअण्णा शेंडगे यांना देखील चांगलेच सुनावलं.

Suresh Dhas 4
MVA Politics : "चुकीच्या निर्णयासोबत जाणार नाही..." ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका शरद पवारांच्या राष्ट्रवादीला अमान्य

'प्रकाशअण्णा शेंडगे तुमचे वडील फार मोठा माणूस होता. या राज्याला त्यांनी बरचं काही दिलं. दुग्ध विकास खातं त्यांनी खूप चांगलं चालवलं. शेळीपालन, मेंढीपालनाचं खूप कामकेलं. तुम्ही लोकसभेला उभे राहिलात. 8 हजार 550 एवढेच मतं पडली. तुम्ही सुद्धा म्हणता, 'संपूर्ण ओबीसी समाज, धनंजय मुंडेंच्या मागं आहे', असे म्हणताना सुरेश धस यांनी हात जोडले. ओबीसी समाज संपूर्ण मागे आहे, इथं कोण बसले आहेत? असा सवाल करत इथं प्रत्येक समाजाचा माणूस आल्याचे आमदार धस यांनी ठणकावून सांगितले.

कोणीही असता, तरी ताकदीने उभा असतो

'राम शिंदे यांना रोहित पवार यांच्याविरोधात फक्त मराठ्यांची मतं पडलीत का? नारायण आबा पाटील फक्त धनगरांच्या मतांवर आले आहेत का? संदीप क्षीरसागर यांचं मतदान किती असेल? संदीप क्षीरसागर यांना 1 लाख 81 हजार मतं पडतात. मग काय मराठा, ओबीसी करता. हा विषय राजकारणाचा नाही. हा विषय सगळ्यांचा आहे. अरे कोणत्याही समाजातील व्यक्तीची हत्या झाली असती, तरी तेवढ्यात ताकदीने आलो असतो. सगळ्या समाजाचे लोक इथं आहेत', असे आमदार धस यांनी म्हटले.

तुम्हाला उत्तर देणार नाही...

'फुले-शाहू-आंबेडकरांचा हा महाराष्ट्र आहे. या महाराष्ट्रात असं मतदान झालं आहे. कशाला धनगर, कशाला मराठा, सगळे आमचेच आहे, जय भीम आमचाच आहे. आम्ही सर्व एकत्र आहोत. तुम्ही हे धंदे बंद करा, अशी माझी विनंती आहे, असे आवाहन करताच, दुसरीकडे पण, बोला. काय बोलायचे असेल ते बोला. आम्ही तुम्हाला उत्तर देणार नाही. हे तुमचं चाललं आहे, हे बरोबर नाही', अशा शब्दात आमदार धस यांनी प्रकाशअण्णा शेंडगे यांना सुनावलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com