Walmik Karad : वाल्मिक 'आका' अन् गँगबरोबरच्या सीसीटीव्हीत दिसला 'तो PSI'; सुरेश धस यांची मोठी मागणी (पाहा VIDEO)

BJP MLA Suresh Dhas PSI Rajesh Patil CCTV Walmik Karad Beed Santosh Deshmukh murder case : केज शहरातील विष्णू चाटे याच्या कार्यालयामध्ये वाल्मिक कराड आणि त्याच्या गँगचे सीसीटीव्हीचे चित्रीकरण पुरावा म्हणून समोर आलं आहे.
Walmik Karad  3
Walmik Karad 3Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : बीडच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणात वाल्मिक कराड याच्याविरोधात मोठा पुरावा समोर आला आहे. हत्येच्या दिवशी वाल्मिक कराड आणि त्याच्या गँगची भेट झाल्याचा 'सीसीटीव्ही' समोर आला आहे.

'या 'सीसीटीव्ही'त उपनिरीक्षक राजेश पाटील देखील दिसत असून, त्याला देखील गुन्ह्यात सहआरोपी करा', अशी मागणी भाजप आमदार सुरेश धस यांनी केली आहे.

भाजप (BJP) आमदार सुरेश धस म्हणाले, "सगळीच्या सगळी गँग 'सीसीटीव्ही'मध्ये दिसत आहे. अवादा कंपनीच्या मॅनेजरचे खंडणीसाठी अपहरण करून, त्याला पाथर्डीपर्यंत नेले. तिथून त्याला मारत मारत पुन्हा आणले". या 'सीसीटीव्ही'मधील गँगमध्ये PSI राजेश पाटील हा देखील दिसतो आहे. त्याला देखील सहआरोपी केले पाहिजे. तशी आमची मागणी आहे, असे सुरेश धस यांनी सांगितले.

Walmik Karad  3
British loot : इंग्रजांनी भारतातून किती पैसा लुटला; अहवालातून आकडा समोर

या प्रकरणात पोलिस (Police) अधिकारी महाजन निलंबित झाले पाहिजे. गर्जे यांना निलंबित करून, पुण्याऐवजी गडचिरोली किंवा चंद्रपूरला पाठवलं पाहिजे, अशी देखील आमची मागणी आहे. यासाठी आपण मुख्यमंत्र्यांना भेटणार आहोत. गर्जेचे सर्व प्रताप पुढं येत आहे, असेही भाजप आमदार सुरेश धस यांनी म्हटले.

Walmik Karad  3
Dhananjay Munde Vs Vijay Wadettiwar : धनंजय मुंडे यांना आणखी एक झटका; वडेट्टीवारांनी साधला निशाणा

खंडणीच्या गुन्ह्यात अटक करण्यात आलेल्या वाल्मिक कराडविरोधात मकोका लावण्यात आला आहे. पुढे त्याला पोलिसांनी संतोष देशमुख यांच्या हत्येच्या कटात आरोपी करत अटक केली. संतोष देशमुख यांच्या हत्येच्या गुन्ह्यात 'CID', 'SIT', बीड पोलिस वेगवेगळ्या पातळीवर तपास करत आहेत. तपासात आज महत्त्वपूर्ण पुरावा समोर आला. 29 नोव्हेंबरला विष्णू चाटे आणि वाल्मिक कराड याच्याकडून आवादा कंपनीकडून खंडणी मागण्यात आली होती. त्यादिवशी वाल्मिक कराड आणि विष्णू चाटे याची भेट झाल्याचे सीसीटीव्हीसमोर आलं आहे.

या सीसीटीव्हीमध्ये वाल्मिक कराडबरोबर सगळीच गँग दिसत आहे. वाल्मिक कराड याच्याबरोबर सुदर्शन चाटे, विष्णू चाटे, कृष्णा अंधाळे, प्रतिक घुले देखील दिसत आहे. या गँगच्या मागे PSI राजेश पाटील देखील सीसीटीव्हीत दिसत आहे. या गँगबरोबर राजेश पाटील नेमकं काय करत होता, असा प्रश्न उपस्थित करत भाजम आमदार सुरेश धस यांनी गुन्ह्यात सहआरोपी करण्याची मागणी केली आहे. राजेश पाटील यांच्यासह इतर पोलिस अधिकाऱ्यांवर देखील कारवाई झाली पाहिजे, असेही सुरेश धस यांनी म्हटले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com