भाजप आमदाराचा नगर परिषद प्रभाग रचेनेवर आक्षेप ; सीईओची निवडणूक आयोगाकडे तक्रार

मुख्य अधिकारी हे त्यांच्या मर्जीतील काही राजकीय नेत्यांचे हितसंबंध जोपासण्यासाठी ते सांगतील त्याप्रमाणे प्रभाग रचना आराखडा तयार करीत आहेत. (Hingoli District)
Mla Tanhaji Mutkule
Mla Tanhaji MutkuleSarkarnama
Published on
Updated on

हिंगोली ः मतदारसंघातील नगर परिषद निवडणुकीच्या प्रभाग रचनेवर आक्षेप घेत भाजपचे आमदार तान्हाजी मुटकुळे (Bjp Mla) यांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची तक्रार थेट राज्य निवडणूक आयोगाकडे केली आहे. (Hingoli) मर्जीतल्या राजकीय नेत्यांना सोयीची अशी प्रभाग रचना ते करून देत असल्याचा आरोप मुटकुळे यांनी केला आहे. (State Election Commission)

त्यामुळे संबंधित सीईओंना निलंबित करून त्यांच्या जागेवर दुसऱ्या अधिकाऱ्यांची नेमणूक करून निवडणूक प्रक्रिया राबवावी, अशी मागणी देखील मुटकुळे यांनी आपल्या पत्रात केली आहे. तान्हाजी मुटकळ यांनी लिहलेल्या पत्रात नगर परिषद प्रभार रचना प्रक्रियेच्या मुख्य अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप केले आहेत.

मुख्य अधिकारी हे त्यांच्या मर्जीतील काही राजकीय नेत्यांचे हितसंबंध जोपासण्यासाठी ते सांगतील त्याप्रमाणे प्रभाग रचना आराखडा तयार करीत आहेत. याबाबत शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे. प्रभाग रचना करतांना पाळण्यात येणाऱ्या गोपनियतेचा पुर्णपणे भंग केला जात असून सीईओ हे पक्षपातीपणाने वागत असल्याचे मुटकुळे यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.

एवढेच नाही तर सीईओंच्या शासकीय निवासस्थानी प्रभाग रचनेतील सोयीच्या बदलासाठी अनेकांची ये-जा वाढली आहे. आयोगाने सीईओंच्या निवासस्थानाचे सीसीटीव्ही फुटेज तपासावे, यातून हे स्पष्ट होईल, असा दावा देखील मुटकुटळे यांनी निवडणुक आयोगाला पाठवलेल्या पत्रात केला आहे. हा गंभीर प्रकार असून याबद्दल मतदारसंघातील नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी आहे.

Mla Tanhaji Mutkule
गिरीश कुबेर यांच्यावर शाईफेक : संभाजी ब्रिगेडचे साहित्य संमेलनात कृत्य

यातून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न देखील निर्माण होऊ शकतो, असा इशारा देतांनाच याची तात्काळ चौकशी करावी. तेसच मुख्याधिकारी अजय कुरवाडे यांना निवडणूक प्रक्रियेपासून बाजूला सारत निलंबित करावे, अशी मागणी देखील करण्यात आली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com