BJP News : अयोध्येतील राम मंदिर प्राणप्रतिष्ठेच्या दिवशी सार्वजनिक सुटी जाहीर करा..

Maharashtra News : राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यावरून राजकीय वातावरण तापले आहे.
BJP News
BJP News Sarkarnama
Published on
Updated on

Marathwada Political News : अयोध्येत प्रभू श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची जय्यत तयारी सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 22 जानेवारी म्हणजेच प्रभू श्रीराम जेव्हा अयोध्येतील राम मंदीरात विराजमान होतील, त्याच क्षणी प्रत्येक देशवासीयाने घरात दिवा लावावा, दिवाळी साजरी करावी, असे आवाहन केले आहे. (BJP News) उत्तर प्रदेशसह देशभरात राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची उत्सूकता शिगेला पोहचली आहे.

BJP News
Ayodhya Ram Temple : काँग्रेस नेत्याचं राम मंदिरावरून वादग्रस्त विधान; म्हणाले...

अयोध्येत भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. (Marathwada) प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासह या सगळ्या कार्यक्रमाचे प्रक्षेपण देशभरात दूरचित्रवाणीवरून केले जाणार आहे. (BJP) या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार प्रत्येक हिंदुत्ववादी नागरिकाला होता यावे, यासाठी छत्रपती संभाजीनगर भाजपकडून 22 जानेवारी रोजी सार्वजनिक सुटी जाहीर करण्याची मागणी करण्यात आली आहे.

भाजपचे शहराध्यक्ष शिरीष बोराळकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने आज जिल्हाधिकारी आस्तीककुमार पांडेय यांची भेट घेत त्यांना निवेदन दिले. (Maharashtra) ऐतिहासिक नगरी अयोध्या येथे 22 जानेवारी रोजी प्रभू श्रीराम मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न होणार आहे. हा क्षण प्रत्येकाने डोळ्यात साठवून ठेवावा असा असल्याने या सोहळ्या अंतर्गत देशभरामध्ये मोठ्या प्रमाणात धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आलेले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

जास्तीत जास्त नागरिकांना या सोहळ्यात सहभागी होता यावे, यासाठी 22 जानेवारी रोजी सार्वजनिक सुटी जाहीर, अशी मागणी या निवेदनात जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह संत, महंत आणि विविध मान्यवरांच्या उपस्थित अयोध्येत प्रभू रामचंद्रांचे आगमन होणार आहे. रामलल्ला हे भव्यदिव्य मंदिरात विराजमान होत आहेत.

प्रभू श्रीरामाच्या अभिषेकाची तयारी पूर्ण करण्यात येत असून या ऐतिहासिक सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी अनेक भाविक अयोध्येत जाणार आहेत. यासाठी त्या दिवशी सार्वजनिक सुटी जाहीर करण्यात यावी, अशी मागणी भाजपकडून करण्यात आली आहे. अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा सोहळा, त्यासाठी देशभरातील राजकीय नेत्यांना देण्यात आलेले निमंत्रण यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये सध्या आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत.

BJP News
BJP News : निवडणूक अन् राम मंदिराबाबत भाजपची रणनीती ठरणार; अमित शाह, नड्डा घेणार बैठक

महाराष्ट्रात उद्धव ठाकरे, खासदार संजय राऊत, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनीही भाजपवर टीका केली आहे. एकीकडे राम मंदीराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यावरून राजकीय वातावरण तापले असतांना आता भाजपकडून सार्वजनिक सुटी जाहीर करण्याची मागणी करण्यात आली आहे.

Edited By : Jagdish Pansare

BJP News
Ram Mandir : प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याला येणार का? बाबरी मशिदीचे पक्षकार थेटच बोलले...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com