Ayodhya Ram Temple : काँग्रेस नेत्याचं राम मंदिरावरून वादग्रस्त विधान; म्हणाले...

Ramlalla In Ayodhya : रामलल्ला मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठापना कार्यक्रमास जाण्याबाबत इंडिया आघाडीत संदिग्धता
Ram Temple, Congress
Ram Temple, CongressSarkarnama
Published on
Updated on

Congress Political News : अयोध्या येथील साकारलेल्या राम मंदिरात येत्या २२ जानेवारीला रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होत आहे. पाचशे वर्षानंतर हे मंदिर झाल्याचा दावा भाजपच्या वतीने करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या बड्या नेत्याने राम मंदिरावरून एक वादग्रस्त विधान केले आहे. परिणामी भाजप आणि काँग्रेस भिडण्याची शक्यता असल्याचे राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

काँग्रेस नेते उदित राज यांनी आपल्या ट्विटर हँडलवरून भाजपला लक्ष्य करताना वादग्रस्त विधान केले आहे. 22 जानेवारी रोजी राम मंदिरात (Ram Temple) रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापणा करण्यात येणार आहे. हाच मु्द्दा पकडून राज यांनी देशात पुन्हा पाचशे वर्षांनंतर मनुवाद परतला आहे, असे विधान केले आहे. राज यांच्या विधानामुळे राम मंदिरावरून इंडिया आघाडीतील घटक पक्षांच्या भूमिकेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Ram Temple, Congress
Eknath Shinde : वारकऱ्यांच्या सेवेतून खासदार श्रीकांत शिंदेंचे होणार 'कल्याण' ?

दरम्यान, या कार्यक्रमासाठी सरकारच्या वतीने काँग्रेस नेत्यांनाही निमंत्रण देण्यात आलेले आहे. यात सोनिया गांधी (Sonia Gandhi), मल्लिकार्जुन खर्गे, लोकसभेतील पक्षाचे नेते अधीर रंजन चौधरी यांचा समावेश आहे. मात्र काँग्रेसच्या वतीने कार्यक्रमाला जायचे की नाही, याबाबत आपली भूमिका अद्याप जाहीर केलेली नाही. लोकसभेच्या पार्श्वभूमीवर भाजप या मुद्दाचे भांडवल करण्याची शक्यता आहे. त्यामुळे काँग्रेसच्या भूमिकेकडे लक्ष लागले आहे.

कोण आहेत उदित राज ?

उदित राज यांनी 2014 मध्ये (BJP) भाजपच्या तिकिटावर दिल्लीतून निवडणूक लढवून जिंकली होती. त्यानंतर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. दरम्यान, त्यांनी आपली राजकीय कारकीर्द आपलाच पक्ष इंडियन जस्टिस पार्टीपासून केली होती. आता त्यांनी राम मंदिरावरील केलेल्या विधानामुळे काँग्रेसच्या अडचणीत भर पडल्याची शक्यता असल्याचे बोलले जात आहे.

(Edited by Sunil Dhumal)

Ram Temple, Congress
Maharashtra Politics : ग्रामीण भागात 'मतपेरणी'साठी भाजपचं नवं 'कौशल्य'...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com