Dr.Bhagwat Karad News : बागेश्वर धामच्या दरबारात मंत्री कराडांची `परची` निघणार का ?

BJP News : कराड यांना आता छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवायची आहे.
Dr.Bhagwat Karad News
Dr.Bhagwat Karad NewsSarkarnama
Published on
Updated on

Marathwada Political News : केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डाॅ. भागवत कराड यांच्या पुढाकाराने पुढील तीन दिवस छत्रपती संभाजीनगर शहरात बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांची कथा आणि दरबार भरणार आहे. (BJP Political News) गेल्या महिनाभरापासून कराड आणि त्यांचे पुत्र हर्षवर्धन भाजपच्या टीम सोबत या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी झटत आहेत. काल धीरेंद्र शास्त्री यांचे शहरात भव्य स्वागत आणि आजच्या कलश यात्रेने मोठी वातावरण निर्मिती झाली.

Dr.Bhagwat Karad News
Manoj Jarange Patil News : गावबंदीमुळे पंचाईत झालेल्या नेत्यांची रुग्णालयात गर्दी...

धीरेंद्र शास्त्री आपल्या दरबारात लोकांच्या समस्या ओळखून त्यांचे समाधान `परची` (चिठ्ठी) द्वारे करतात. यासाठी त्यांच्या दरबारात मोठी गर्दी होत असते. (BJP) यावरून त्यांच्यावर टीकाही होते. मात्र, त्यांच्या दरबारात `परची` आणि त्याद्वारे भक्तांच्या समस्यांचे निवारण केले जात असल्याचा दावा केला जातो. चार महिन्यांपूर्वी शिंदे गटाचे आमदार प्रदीप जैस्वाल यांनी शहरात पंडित प्रदीप मिश्रा यांच्या शिवपुराण कथेचे भव्य आयोजन केले होते.

या कार्यक्रमाला अभूतपूर्व असा प्रतिसाद मिळाला होता. या आयोजनामागे स्वार्थ आणि परमार्थ म्हणून बघितले गेले. (Marathwada) पंडित प्रदीप मिश्रा यांच्या शिवमहापुराण कथेपासूनच शहरात बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या कथा आणि दरबाराचे आयोजन करण्याचे प्रयत्न डाॅ. कराड (Dr.Bhagwat Karad) यांनी सुरू केले होते. विशेष म्हणजे या स्पर्धेत त्यांच्याच पक्षातील राज्याचे गृहनिर्माण मंत्री अतुल सावेही होते, पण कराडांनी आघाडी घेत धीरेंद्र शास्त्री यांच्या कथेची वेळ मिळवली आणि आता ती प्रत्यक्षात सुरू झाली आहे.

राज्यसभेवर खासदार आणि त्यानंतर काही दिवसांतच अर्थ खात्याचे राज्यमंत्री पद मिळालेल्या कराड यांना आता छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवायची आहे. पक्षाने त्यांना तसे आदेश दिले असून, त्याच्या तयारीचा भाग म्हणूनच या कार्यक्रमाकडे पाहिले जाते. धीरेंद्र शास्त्री हे कट्टर हिंदुत्ववादी आणि सनातन धर्माचे पुरस्कर्ते म्हणून ओळखले जातात. छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघ हा कायम हिंदुत्ववादी विचारांच्या पाठीशी राहिलेला आहे. शिवसनेने या मतदारसंघातून सहा वेळा विजय मिळवला आहे, पैकी चार वेळा चंद्रकांत खैरे सलग लोकसभेवर निवडून गेले होते.

आता उद्धव ठाकरे यांची शिवसेना भाजपसोबत नसल्यामुळे पहिल्यांदात छत्रपती संभाजीनगर लोकसभेची जागा लढवण्याची संधी भाजपकडे आहे. ती हेरण्याचा निर्धार दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांनी केल्यामुळे कराडांना कामाला लागा असे आदेश देण्यात आल्याची चर्चा आहे. बागेश्वर धामच्या कथाकार धीरेंद्र शास्त्री यांची कथा आणि दरबाराच्या माध्यमातून हिंदू मतदारांना आकर्षित करण्याचा भाजपचा हा प्रयोग किती यशस्वी होतो? हे येणाऱ्या निवडणुकीत दिसून येईल. आपल्या भक्तांची दरबारात `परची`, काढून त्यांच्या इच्छा पूर्ण करणारे धीरेंद्र शास्त्री डाॅ. भागवत कराड यांच्या लोकसभा विजयाची `परची` काढतात का ? याकडे आता सगळ्यांचे लक्ष असणार आहे.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com