Marathwada Political News : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी प्रभावी आणि परिणामकारक आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील यांनी दुसऱ्या टप्प्यातील आंदोलनात राजकीय नेत्यांना गावबंदी केली होती. (Manoj Jarange Patil News) अंतरवाली सराटीत आंदोलकांवर झालेल्या लाठीहल्ल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी राज्यभरातील सर्वच पक्षांच्या नेत्यांनी धाव घेतली होती. परंतु चाळीस दिवसांची मुदत उलटून गेल्यानंतरही सरकारने आरक्षणासंदर्भात ठोस निर्णय घेतला नाही, यावर मनोज जरांगे चांगलेच आक्रमक झाले.
सरकारला पेलणार नाही, झेपणार नाही असे आंदोलन करत त्यांनी मंत्री, आमदार, खासदार यांना गावबंदी जाहीर केली. (Maratha Reservation) जरांगे यांच्या आवाहनाला असा प्रतिसाद मिळाला की पाचशेहून अधिक गावांत राजकीय नेत्यांसाठी गावबंदीचे फलक लागले. शिवाय दिसेल तिथे मराठा आंदोलक राजकीय नेत्यांचे कार्यक्रम उधळून त्यांना पिटाळून लावत होते. (Marathwada) त्यामुळे दुसऱ्या टप्प्यातील आंदोलनात एकाही राजकीय नेत्याला अंतरवालीत प्रवेश नव्हता.
आता सरकारच्या शिष्टाईनंतर मनोज जरांगे यांनी बेमुदत उपोषण स्थगित केले आणि छत्रपती संभाजीनगरच्या गॅलेक्झी या खासगी रुग्णालयात ते गेल्या पाच दिवसांपासून उपचार घेत आहेत. (Maharashtra) ज्यांना गावबंदीमुळे अंतरवालीत जाऊन जरांगे यांना पाठिंबा दर्शवता आला नाही, त्यांनी आता रुग्णालयात गर्दी केली आहे. दररोज विविध पक्षांचे आमदार, खासदार, नेते, मंत्री आणि सामान्यांची रुग्णालयात गर्दी होत असल्याने रुग्णालय प्रशासनही हैराण झाले आहे.
दोन्ही शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस, भाजप अशा सगळ्याच पक्षांचे नेते गॅलेक्झीत धाव घेताना दिसत आहेत. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, राजेश टोपे, अर्जुन खोतकर, प्रकाश सोळंके यांच्यासही अनेकांनी जरांगे पाटील यांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.
दरम्यान, संभाजीराजे छत्रपती यांनी जरांगे यांची भेट घेऊन त्यांना गर्दी टाळण्याचे आणि आराम करण्याचे आवाहन केले होते, परंतु भेटायला येणाऱ्यांची संख्या एवढी आहे, की जरांगे यांचाही नाइलाज होत आहे. या शिवाय प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधीही गॅलेक्झी रुग्णालयातूनच जरांगे पाटील यांच्या पत्रकार परिषदा आणि महत्त्वाच्या निर्णयांची माहिती देत आहेत. त्यामुळे गॅलेक्झीमधील जरांगे यांच्या खोलीला एखाद्या वाॅररूमचे स्वरूप प्राप्त झाले आहे.
Edited By : Jagdish Pansare
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.