Protest For Maratha Resrvation News : ओबीसीतून आरक्षण द्या, नाहीतर तेलंगणात जाण्याची परवानगी द्या..

Maharashtra : तर आज आंध्र प्रदेशात मराठा जातीचा समावेश ओबीसीमध्ये असल्यामुळे मराठा समाजाची नोंद इतर मागास वर्गात राहिली असती.
Protest For Maratha Reservation
Protest For Maratha Reservation Sarkarnama

Chhatrapati Sambhajinagar : मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण (Protest For Maratha Resrvation News) द्या, या मागणीसाठी सकल मराठा समाजाच्या वतीने छत्रपती संभाजीनगरात तीन दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. दरम्यान, आजा आंदोलनकर्त्यांनी ओबीसीतून आरक्षण द्या, नाहीतर तेलंगणात जाण्याची परवानगी द्या, अशी खळबळजनक मागणी केली.

Protest For Maratha Reservation
Latur District APMC News : जिल्ह्यात मतदारांचा कौल `फिप्टी-फिप्टी`, देशमुख-निलंगेकरांनी गड राखले..

१ मे महाराष्ट्र दिनापासून या ठिय्या आंदोलनाला शहरातील क्रांतीचौक येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ सुरूवात झाली आहे. (Maratha Reservation) सहकार मंत्री अतुल सावे (Atul Save) यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेतली असली तरी आंदोलक मागण्यांवर ठाम आहेत. आज आंदोलनाच्या तिसऱ्या दिवशी ओबीसीतून आरक्षण द्या, अन्यथा तेलंगणात जाण्याची परवानगी द्या, अशी नवी मागणी करण्यात आली.

प्रा. चंद्रकांत भराट यांनी या सदंर्भात तेंलगणा राज्यात मराठा समाजाचा मागास वर्गात समावेश असल्यामुळे तिथे आरक्षण दिले जाते या मुद्याकडे लक्ष वेधले. ते म्हणाले, मराठवाडा (Marathwada) प्रदेश मुक्त होण्यापुर्वी तो आंध्र प्रदेशचाच भाग होता. १९६० सालापर्यंत मराठा समाजाचा इतर मागासवर्गात समावेश होता.

मात्र संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीवेळी मराठवाडा विनाअट महाराष्ट्रात सामील झाला. मराठवाडा तेव्हा संयुक्त महाराष्ट्रात सामील झाला नसता तर आज आंध्र प्रदेशात मराठा जातीचा समावेश ओबीसीमध्ये असल्यामुळे मराठा समाजाची नोंद इतर मागास वर्गात राहिली असती. महाराष्ट्र सरकारने आम्हाला ओबीसीतून आरक्षण द्यावे, नाहीतर तेलंगणात जाण्याची परवानगी द्यावी.

दरम्यान अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी आंदोलकांची भेट घेतली. मराठा समाजाला आरक्षणासाठी मराठा समाज हा मागास आहे हे ठरवावे लागणार असल्याने पुन्हा आयोग स्थापन करून सर्वेक्षण करावे लागेल असे पाटील यांनी यावेळी सांगितले. तर सहकार मंत्री अतुल सावे यांनी आंदोलकांचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांशी बोलणे करून देणार असल्याचे आश्वासन दिले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com