BJP official Committed Suicide News
BJP official Committed Suicide NewsSarkarnama

BJP official News : मुलांना संस्कार देण्यात कमी पडल्याची खंत, भाजप पदाधिकाऱ्याची आत्महत्या..

Marathwada : हा निर्णय माझाच आहे आणि तुम्ही मला खरंच माफ करताल असं वाटत नाही. तर कृपया मला माफ करावं.

Chhatrapati Sambhajinagar : भारतीय जनता पक्षाच्या (Bjp) तालुका उपप्रमुखाने आपण मुलांना कर्जबाजारी होऊन शिकवले मात्र त्यांना संस्कार देऊ न शकल्याची खंत व्यक्त करत टोकाचे पाऊल उचलले. आपण आत्महत्या करीत असल्याची माहिती फेसबुकवर पोस्ट करत त्याने लिंबाच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केल्याची हदयद्रावक घटना दावरवाडी (ता.पैठण) येथे सोमवारी (ता.१०) रात्री साडेअकराच्या सुमारास घडली.

BJP official Committed Suicide News
Chandrakant Patil News: ''...म्हणून उध्दव ठाकरेंना फोन करणार!''; राजकीय गदारोळानंतर चंद्रकांत पाटलांचा सूर बदलला

दावरवाडी येथील दत्तात्रय राधाकिसन सोरमारे (वय ४९ वर्षे) यांना तीन मुली व एक मुलगा आहे. (Marathwada) एका मुलीचे लग्न झाले तर एक मुलगा व दोन मुलींचे पदवीपर्यंत शिक्षण झाले आहे. (Paithan) सोमवारी (ता.१०) साडेदहा वाजेच्या दरम्यान दत्तात्रय सोरमारे यांनी फेसबुकवर `मी मुलांना ग्रॅज्यूएटपर्यंत शिक्षण देण्यापायी कर्जबाजारी झालो, त्यांना शिक्षण दिले परंतु संस्कार देण्यास कमी पडलो म्हणून मी आत्महत्या करीत आहे`, अशी पोस्ट टाकली.

त्यानंतर कुणाला काही न सांगता ते साडेदहा वाजता घराबाहेर पडले. फेसबुकवरील गावांतील मित्रांनी त्यांना फोन केला मात्र त्यांनी कुणाचे फोन घेतले नाही. जेव्हा त्यांच्या कुटुबियांना ही माहिती मिळाली तेव्हा ग्रामस्थांसह कुटुंबिय सोरमारे यांना शोधण्यासाठी बाहेर पडले. तर काहींनी पाचोड पोलीसांना घटनेची माहीती दिली.

पाचोड पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष माने यांनी सायबर शाखेला ही माहीती कळवून लोकेशन घेतले व स्वतः सहकार्‍यासमवेत शोध सुरु केला. रात्री साडेबारा वाजेच्या सुमारास दावरवाडी-पैठण रस्त्यावर लिंबाच्या झाडाला सोरमारे यांचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. आत्महत्येपुर्वी त्यांनी स्वतःचा एक 'सेल्फी' काढून अपलोड केल्याचेही समोर आले.

या घटनेने सोरमारे यांचे कुटुंबिय व नागरिक हादरून गेले. मंगळवारी (ता. ११) सकाळी उत्तरीय तपासणीनंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. दत्तात्रय सोरमारे यांनी आत्महत्येपूर्वी फेसबुकवर लिहीलेल्या पोस्टमध्ये म्हटले की, "प्रिय मित्र आणि नातेवाईक तुम्हाला सांगताना माझा कंठ अतिशय दाटून येत आहे. कारण मी तुम्हाला यानंतर कधीही भेटणार नाही. माझेकडे काही मित्रमंडळीचे जे काही पैसे आहेत, माझी प्रामाणिक इच्छा होती की मी आज ना उद्या तुमचे पैसे देईल.

BJP official Committed Suicide News
Jaydatta Kshirsagr Allegation News : सत्ता हे टोल कलेक्शन, टक्केवारीचे माध्यम नाही ; क्षीरसागरांचा निशाणा कोणावर ?

पण माझेवर असं काही प्रसंग आला आहे की मला नाइलाजाने आत्महत्या करावी लागत आहे. कारण माझ्यावर असा काही प्रसंग आला की मी कोणालाही तो सांगू शकत नाही. माझे एक स्वप्न होते की माझं कुटुंब ग्रॅज्युएट कराव . त्यामुळे मी माझ्याकडून मुलांचे उच्च शिक्षणासाठी आटोकाट प्रयत्न केले. कधी मला अडचण आली तर मी लोकांकडेही हात पाय पसरले आणि त्यांचे शिक्षण केले. पण त्याचे फळ म्हणून मला आज आत्महत्या करावी लागत आहे.

कारण मी सगळं काही करू शकलो, पण माझ्या मुलांना संस्कार देऊ शकलो नाही. त्यामुळे मी आज फाशी घेत आहे. कोर्ट कधी सजा देईल नाही देईल. पण मी असा निर्णय घेतला की माझ्या गुन्ह्याची मला सजा मिळायला पाहिजे. कारण की मी माझ्या मुलांचे शिक्षण करून फार मोठी चूक केलेली आहे. काही माझी हितचिंतक असतील, माझे नातेवाईक असतील त्यांना माझा हा निर्णय पटणार नाही. पण मित्रहो मला माफ करा. हा निर्णय माझाच आहे आणि तुम्ही मला खरंच माफ करताल असं वाटत नाही. तर कृपया मला माफ करावं , एवढीच हात जोडून विनंती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com