Jaydatta Kshirsagr Allegation News : सत्ता हे टोल कलेक्शन, टक्केवारीचे माध्यम नाही ; क्षीरसागरांचा निशाणा कोणावर ?

Market Committee : बाजार समिती म्हणजे जुगार, गुटख्याचे अड्डे नाहीत.
Ex.Minister Jaydatta Kshirsagar News
Ex.Minister Jaydatta Kshirsagar NewsSarkarnama
Published on
Updated on

Beed : बीड बाजार समिती निवडणुकीच्या प्रचाराला आणि एकमेकांवरील आरोप प्रत्यारोपाला आता सुरूवात झाली आहे. या निवडणुकीत देखील माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर आणि त्यांचे पुतणे राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागर (Sandip Kshirsagar) यांच्यात चढाओढ पहायला मिळणार आहे. याची सुरूवात निवडणूक प्रचारातील आरोप-प्रत्यारोपातून सुरू झाली आहे.

Ex.Minister Jaydatta Kshirsagar News
Beed Market Committee News : आघाडी-युतीचे जमेना, भाजपमध्येही फूट ; क्षीरसागरांची खेळी यशस्वी ठरणार ?

`सत्ता हे टोल कलेक्शनचे माध्यम नाही. बीडीओच्या बाजूला खुर्चीत बसून टक्केवारी दिली तरचं फाईल काढा म्हणतात. (Beed) मला विचारल्या शिवाय फेरफार करायचा नाही असं सांगतात`, असा आरोप करत माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर (Jaydatta Kshirsagar) यांनी पुतणे आमदार संदीप क्षीरसागर यांच्यावर नाव न घेता केला.

बाजार समिती म्हणजे जुगार, गुटख्याचे अड्डे नाहीत, असा टोला लगावत त्यांनी आपल्याविरोधात एकत्र येवू पाहणाऱ्या भाजप, शिंदे गट शिवसेनाच्या जिल्हाप्रमुखांनाही लगावला. बीड येथे बाजार समिती निवडणुकीच्या मतदार मेळाव्यात बोलतांना क्षीरसागरांनी विरोधकांवर जोरदार हल्ला चढवला.

जयदत्त क्षीरसागर म्हणाले, सत्ता हे सेवेचे साधन आहे, सत्ता लाटण्याचे नाही. सत्ता टोलकलेक्शन, टक्केवारी खाण्याचे देखील माध्यम नाही. पण दुर्दैवाने सत्ता मिळाली म्हणजे आपल्या टक्केवारी गोळा करण्याचा अधिकार मिळाल्याचा समज काहीजणांमध्ये दृढ झाला आहे. सरकारने शेतकऱ्यांना विहिरी, शेततळे, घरकुल दिले. पण जेव्हा एखादा माणून बीडीओकडे जातो, तेव्हा खुर्चीच्या बाजूला एक माणूस बसलेला असतो अन् तो म्हणतो टक्केवारी दिली तरचं फाईल काढा.

त्याचबरोबर कुणी बीडमध्ये जमीन विकत घेतली तर मला विचारल्याशिवाय फेरफार करायचा नाही, असा दम देतो, अशा शब्दात जयदत्त क्षीरसागर यांनी हल्ला चढवला.समाजात लोकशाही आहे, प्रत्येकाला जगण्याचा, कमावण्याचा अधिकार आहे. मात्र ज्यांना हे कळत नाही त्यांना समज देण्याची, झटका देण्याची ही निवडणूक आहे. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीचा हा पाया आहे, त्यामुळे अतिशय चांगल्या फरकाने आपले पॅनल हे विजयी होणार आहे, असा विश्वास जयदत्त क्षीरसागर यांनी व्यक्त केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com