Latur DCC Bank : सहकार मंत्री पाटील यांना पळवून नेण्याचा डाव, अमित देशमुख यांचा भाजपवर खळबळजनक आरोप!

Amit Deshmukh Babasaheb Patil : आमदार अमित देशमुख यांनी भाजपवर निशाणा साधत म्हटले की, जिल्हा बँकेत सध्या सगळे चांगले चालले असताना विरोधकांकडून नको तो खटाटोप केला जात आहे.
Latur District Central Cooperative Bank; Babasaheb Patil
Latur District Central Cooperative Bank; Babasaheb Patilsarkarnama
Published on: 
Updated on: 

Latur Bank News : लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीदरम्यान सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनाच पळवून नेण्याचा विरोधकांचा आराखडा होता, असा खळबळजनक दावा आमदार अमित देशमुख यांनी करत भाजपवर निशाणा साधला.

लातूर जिल्हा बँकेचा कारभार सुरळित चालू असताना तिथे नाक खुपसण्याचे काम विरोधकांकडून केले जात आहे. अशांना लातूरकरच सडेतोड उत्तर देतील. गेल्या पाच वर्षांत राज्यातील भाजप सरकारने १३ पुरस्कार लातूर जिल्हा बँकेला दिले. किमान त्याचीतरी जाण ठेवून निवडणूकीपासून दूर रहायला हवे होते, अशा शब्दांत आमदार अमित देशमुख यांनी आमदार संभाजी पाटील-निलंगेकर यांच्यावर टिकास्त्र सोडले.

लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सहकार पॅनेलची गुरूवारी बैठक आयोजित करण्यात आली होती. सहकारात चांगले चालले असेल तर तिथे लुडबुड करायची नाही, आडवाआडवी करायची नाही, हे सूत्र आजवरील जिल्ह्यातील सर्व नेत्यांनी पाळले. जिल्हा बँकेत सध्या सगळे चांगले चालले असताना विरोधकांकडून नको तो खटाटोप केला जात आहे.

जिल्ह्यात दुष्काळाची स्थिती आहे. शेतकरी अडचणीत आहेत. येणाऱ्या काही दिवसांत पाणी टंचाईची तिवृता आणखी वाढणार आहे. त्यामुळे या प्रश्नांकडे राज्यात सत्ता असलेल्या आमदारांनी लक्ष द्यायला हवे. पण, त्याकडे दुर्लक्ष करीत सहकारात आडवाआडवी केली जात आहे, असे देशमुख म्हणाले.

गोकुळमध्ये घडले ते बँकेत घडेल...

हा सगळा खटाटोप आपल्या मालकाला खूश करण्यासाठी आणि मालक काहीतरी बक्षीस देईल, या आशेने हे सुरू आहे, अशी टीकाही त्यांनी केली. ‘गोकूळ’मध्ये जे घडले ते याही निवडणूकीत घडू शकते. त्यामुळे सजग रहा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

Latur District Central Cooperative Bank; Babasaheb Patil
BJP MLA : भाजप आमदाराच्या वडिलांनी सरकारी जमीन हडपली? ग्रामस्थ आक्रमक; आरोप होताच थेट मुख्यमंत्र्यांना पत्र

हो, आम्ही चेहरा पाहून कर्ज देतो

'चेहरा पाहून आम्ही कर्ज देतो', असा आरोप विरोधकांकडून आमच्यावर केला जात आहे. हे खरंच आहे. आम्ही चेहरा पाहून कर्ज देतो. हा चेहरा शेतकऱ्यांचा, सर्वसामान्यांचा आहे. गरजू लोकांचा आहे. कर्ज देणे हे आमचे कर्तव्यच आहे. ते आम्ही पार पाडत आहोत.

विशेष म्हणजे आजवर कधीही सक्तीने कर्जवसुली केलेली नाही. एखाद्याचे कर्ज थकले आहे म्हणून त्याच्या दारात जाऊन आमचे कर्मचारी थांबले आहेत, असे कधीही घडले नाही, असे धीरज देशमुख यांनी सांगितले.

Latur District Central Cooperative Bank; Babasaheb Patil
Former MP Join BJP : निवडणुकीच्या तोंडावर माजी खासदार तथा माजी CBI अधिकाऱ्याचा भाजपमध्ये प्रवेश; उत्तर प्रदेशमध्ये बसपाला धक्का

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.