परभणी : राष्ट्रवादीचे प्रदेश प्रवक्ते तथा राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना आज ईडीने अटक केली. (Nawab Malik) मनी लाॅन्ड्रींग प्रकरणात ही अटक करण्यात आली असून या कारवाईने राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. (Bjp) महाविकास आघाडी सरकारच्या मंत्री आणि नेत्यांमध्ये खलबते सुरू झाली आहेत, तर भाजपमध्ये पुढचा नंबर कोणाचा हे सांगण्याची स्पर्धा लागली आहे. (Parbhani) या दरम्यान, परभणी भाजप कार्यकर्त्यांनी नवाब मलिक यांना झालेल्या अटकेबद्दल आनंद व्यक्त करत फटाकेही फोडले.
नवाब मलिक हे परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. गेल्या काही महिन्यांपासून राज्यात ईडी विरुद्ध महाविकास आघाडी सरकार असा सामना पहायला मिळाला. अर्थात याला राज्यातील भाजप नेत्यांकडून रसद पुरवली जात असल्याचा आरोप सातत्याने केला जात होता. भाजपचे नेते किरीट सोमय्या यात आघाडीवर होते. आर्यन खाड ड्रग्ज प्रकरणाच्या निमित्ताने मैदानात उतरलेल्या नवाब मलिक यांनी भाजपच्या नेत्यांना अंगावर घेत जशास तसे अशी भूमिका घेतली.
यातून किरीट सोमय्या, देवेंद्र फडणवीस या नेत्यांवर देखील मलिक यांनी गंभीर आरोप केले. मलिकांवर पलटवार करतांना फडणवीस यांनी त्यांचे थेट अंडरवल्डशी संबंध असल्याचे आरोप करत खळबळ उडवून दिली होती. या सगळ्या आरोपांची पार्श्वभूमी महाविकास आघाडी सरकार व भाजपमध्ये ताणले गेलेले संबंध यात ईडीकडून होणारी कारवाई चांगलीच चर्चेत आली.
नवाब मलिक हे परभणीचे पालकमंत्री असल्यामुळे २६ जानेवारी रोजी ते प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण करण्यासाठी परभणीत येणार होते. त्यापुर्वीच भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी नवाब मलिक यांचे अंडरवल्डशी संबंध असल्याच्या कारणावरून त्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यास विरोध दर्शवला होता.
मलिक यांच्या समक्षच भाजपने राष्ट्रवादीच्या कार्यालयाबाहेर आंदोलन केले होते. त्यामुळे आज महिनाभरानंतर मनी लाॅन्ड्रींग प्रकरणात ईडीने मलिक यांना अटक केल्यानंतर त्याचे पडसाद परभणीत लगेच उमटले. ईडीच्या कारवाईबद्दल आनंद व्यक्त करत भाजपने फटाके वाजवत आनंद व्यक्त केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.