Chhatrapati Sambhajinagar Constituency : संभाजीनगरच्या जागेवर भाजपची दावेदारी संपली ? आता मनोमिलनाच्या बैठका...

Political News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संभाजीनगरच्या जागेवरील दावा कायम ठेवला. कुठल्याही परिस्थितीत तडजोड न करण्याची भूमिका घेत आक्रमक पावित्रा घेतल्याने तीन वर्षांपासून संभाजीनगरात लोकसभेची तयारी करणाऱ्या भाजपने नमते घेतले.
bjp-shivsena meeeting
bjp-shivsena meeeting Sarkarnama
Published on
Updated on

Chhatrapati Sambhajinagar news : 'मेरे संभाजीनगरवालो यहा से मोदीजी को कमल चुन के भेजोगे क्या?,' असे आवाहन करत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी पहिली प्रचार सभा गाजवली होती. भाजपचे चाणक्य आणि देशातील दुसऱ्या क्रमांकाचे भाजपमधील नेते अशी ओळख असलेल्या शाह यांनीच कमळ निवडून देणार का? असे जाहीर विचारले तेव्हा संभाजीनगरची जागा कोण लढवणार? हे स्पष्ट झाले होते.

लोकसभा निवडणूक जाहीर होऊन त्यानंतर जागावाटपाच्या चर्चा सुरू झाल्या तेव्हा खरा खेळ सुरू झाला. भाजपने अनेक सर्व्हे, शिवसेनेत (Shivsena) फूट पडल्यानंतर ताकद कमी झाल्याचे दाखले देत शिवसेना शिंदे गटाला नमवण्याचा प्रयत्न केला. पण राज्यातील इतर मतदारसंघात आलेल्या अनुभवातून धडा घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी संभाजीनगरच्या जागेवरील दावा कायम ठेवला. कुठल्याही परिस्थितीत तडजोड न करण्याची भूमिका घेत आक्रमक पवित्रा घेतल्याने तीन वर्षांपासून संभाजीनगरात लोकसभेची तयारी करणाऱ्या भाजपने नमते घेतले. (Chhatrapati Sambhajinagar Constituency News)

bjp-shivsena meeeting
Marathwada Vanchit Bahujan Aghadi : अकेली वंचित आघाडी क्या करेगी..?

शिवसेना शिंदे गटाला संभाजीनगरची जागा सोडण्याचे निश्चित झाले असून, आता अधिकृत उमेदवाराची घोषणा होण्याची औपचारिकता शिल्लक राहिले आहे. राज्य आणि दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांनी संभाजीनगरची जागा शिवसेनेला देण्याचा निर्णय घेतल्यामुळे जिल्ह्यातील भाजपच्या इच्छूक मंत्री, नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये कमालीची नाराजी आहे. पण आता ती दूर सारून मिशन 45 साठी या सगळ्यांना शिवसेनेच्या म्हणजेच महायुतीच्या उमेदवारासाठी काम करावे लागणार आहे.

याची सुरुवात मनोमिलनाच्या बैठकांमधून झाली आहे. दोन दिवसांपूर्वी संभाजीनगर लोकसभा मतदारसंघातील शिवसेना शिंदे गटाचे संभाव्य उमेदवार जिल्ह्याचे पालकमंत्री संदीपान भुमरे यांच्या शहरातील संपर्क कार्यालयात भाजपच्या मंत्री, स्थानिक नेते, पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

या वेळी भुमरे यांनी आपली खुर्ची केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डाॅ. भागवत कराड यांना दिली आणि ते दुसऱ्या खुर्चीवर त्यांच्या शेजारी बसले. राज्यातील मंत्री अतुल सावे, शिवसेनेचे आमदार प्रदीप जैस्वाल, राष्ट्रवादीचे सतीश चव्हाण, संजय केणेकर अशा सगळ्यांचीच या बैठकीला उपस्थिती होती.

या शिवाय महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचार कार्यालयाची जागा ठरवण्यासाठी हे नेते काही दिवसांपूर्वी एकत्र आले होते. त्यानंतर सोमवारी शिवसेनेचे प्रवक्ते आमदार संजय शिरसाट यांच्या संपर्क कार्यालयात मंत्री संदीपान भुमरे, जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ व स्थानिक पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. उद्या गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर शिवसेनेच्या उमेदवाराची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना-भाजप नेत्यांच्या मनोमिलनाच्या बैठका चर्चेचा विषय ठरत आहेत.

(Edited By : Sachin Waghmare)

R

bjp-shivsena meeeting
Chhatrapati Sambhajinagar Constituency: मराठ्यांनो...वज्रमूठ बांधा, निवडणूक ताब्यात घ्या, हीच श्रींची इच्छा!

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com