भाजपचे लक्ष्मण पवार हॅट्रिक करतील; शिवसेनच्या क्षीरसागरांना विश्वास

क्रिकेटमध्ये गोलंदाज सलग तीन विकेट घेऊन हॅट्रिक करतो तशीच हॅट्रिक आमदार लक्ष्मण पवार हे विधानसभेच्या मैदानात करतील. ( Beed Shivsena)
Mla Laxman Pawar-Bharatbhushan Kshirsagar
Mla Laxman Pawar-Bharatbhushan KshirsagarSarkarnama
Published on
Updated on

बीड : राज्याच्या राजकारणात कसल्याही युत्या - आघाड्या असल्या तरी जिल्ह्यात मात्र स्थानिक समिकरणांनुसार गणित आखले जाते. (Beed Shivsena) सध्या राज्यात भाजप - शिवसेनेतून विस्तव आडवा जात नसला तरी बीडमध्ये शिवसेनच्या नेत्यांनी भाजपच्या (Bjp) नेत्यांबद्दल कौतुकोद्‌गार काढत विधानसभेत हॅट्‌ट्रीक करतील, असा विश्वासही व्यक्त केला आहे. (Marathwada)

बीडचे शिवसेनेचे मावळते नगराध्यक्ष भारतभूषण क्षीरसागर यांनी भाजपच्या आमदार लक्ष्मण पवार यांना शुभेच्छा देत तसा विश्वास व्यक्त केला. आता नगर पालिका निवडणुकीत डॉ. क्षीरसागर यांच्या गळ्यात भगवाच असेल का हे मात्र खात्रीने सांगता येत नाही. यात फरक एवढाच झाला की पुर्वी बीडचे क्षीरसागर गेवराईत बदामराव पंडित यांना ‘पीच’तयार करुन देत, आता बदलत्या समिकरणात त्यांनी तेच ‘पीच’लक्ष्मण पवार यांच्यासाठी करुन देत आहेत.

यापूर्वीही भाजपच्या लक्ष्मण पवार यांच्या स्थानिक विकास निधीतील सभागृहाचे भूमिपुजन शिवसेनेचे माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी केले हेाते. बीड जिल्ह्याच्या राजकारणात क्षीरसागर, पंडित, मुंडे, आडसकर, सोळंके हे मातब्बर राजकीय घराणे. पुर्वी मुंडे सोडता सगळे काँग्रेसी. बदलत्या समिकरणांत आता सगळ्याच या राजकीय घराण्यांनी राजकीय पक्ष बदलले. पण, पुर्वी काँग्रेस व नंतर राष्ट्रवादी या एकाच पक्षात असताना क्षीरसागर व पंडितांमध्ये कधीही विस्तव आडवा गेला नाही.

माजी मंत्री शिवाजीराव पंडित व दिवंगत माजी खासदार केशरबाई क्षीरसागर यांच्यात राजकीय ३६ चा आकडा असे. जिल्ह्याच्या राजकीय कुरुक्षेत्रात घरात राजकीय दुफळीचा अंकही प्रथम पंडितांच्या घरातून सुरु झाला. माजी मंत्री शिवाजीराव पंडित यांना चुलत बंधू बदामराव पंडित यांनी आव्हान दिले. बदामरावांना बीडच्या क्षीरसागरांनी पाठबळ दिले. त्याचा बदलाही पंडितांनी घेतला. नंतर मात्र मागच्या जिल्हा परिषद निवडणुकीपासून त्यांच्यात काहीसे सुरळीत राजकारण सुरु होते.

मागच्या नगर पालिका निवडणुकीत भारतभूषण क्षीरसागर राष्ट्रवादीचे थेट जनतेतून नगराध्यक्षपदाचे उमेदवार होते. तर, विरोधात पुतणे संदीप क्षीरसागर यांची काकू - नाना आघाडी होती. त्यावेळी मात्र अमरसिंह पंडित यांनी आपले वजन क्षीरसागर यांच्या पारड्यात टाकले. नंतर अमरसिंहांनीच संदीप क्षीरसागर यांच्या पारड्यात वजन टाकल्याने त्यांचे राष्ट्रवादीतही वजन वाढले. मागच्या लोकसभा निवडणुकीत जयदत्त क्षीरसागर व भारतभूषण क्षीरसागर यांनी राष्ट्रवादी सोडून शिवसेनेत प्रवेश केला.

Mla Laxman Pawar-Bharatbhushan Kshirsagar
सत्तारांनीच सांगितले, माझ्यात आणि भुमरेंमध्ये राजकीय संघर्ष...

त्यांचे राजकीय समिकरण बदलले तसे क्षीरसागरांनी आपली गेवराई मतदार संघाबाबतची रणनितीही बदलल्याचे चित्र आहे. गेवराईत सध्या राष्ट्रवादीचे अमरसिंह पंडित व भाजपचे आमदार लक्ष्मण पवार तुल्यबळ आहेत. माजी मंत्री बदामराव पंडित काहीसे मागे पडल्याचे चित्र आहे. तसे, क्षीरसागर यांनीही आपली भूमिका बदामरावांच्या ऐवजी पवारांच्या मागे असल्याचे जाणिवपूर्वक दाखवून द्यायला सुरुवात केली आहे.

एका क्रिकेट स्पर्धेच्या निमित्ताने भारतभूषण क्षीरसागर यांनी क्रिकेटमध्ये गोलंदाज सलग तीन विकेट घेऊन हॅट्रिक करतो तशीच हॅट्रिक आमदार लक्ष्मण पवार हे विधानसभेच्या मैदानात करतील असा विश्वास उपस्थितांसमोर व्यक्त केला. गेवराईचे पवार घराणे आणि आमचे काकुंच्या काळापासूम जुने कौटुंबीक संबध आहेत मग ते कोणत्याही पक्षात असोत, असेही त्यांनी सांगीतले.

गेवराईचे आमदार पवार यांनी दोनवेळा आमदारकी मिळवून आतापर्यंतची सगळे आश्वासने पूर्ण केले आहेत. एक आदर्श आमदार कसा असावायाच ते उदाहरण असल्याचेही क्षीरसागर म्हणाले. सध्या राज्यात भाजप व शिवसेनेत विस्तव आडवा जात नाही. मात्र, सध्यातरी शिवसेनेचे असलेल्या डॉ. क्षीरसागर यांनी भाजपच्या लक्ष्मण पवार यांचे जाहीर कौतुक तर केलेच. शिवाय तिसऱ्यांदा आमदार होतील, असाही विश्वास व्यक्त केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com