Teachers constituency : केंद्र, राज्यातील मंत्री, खासदार, आमदारांच्या उपस्थितीत भाजपचे पाटील १२ रोजी अर्ज दाखल करणार ..

Marathwada : भाजपने सर्वात आधी किरण पाटील यांच्या उमेदवारीची घोषणा केली होती.
Marathwada Teachers constituency News, Aurangabad
Marathwada Teachers constituency News, Aurangabad
Published on
Updated on

Aurangabad : मराठवाडा शिक्षक मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी सर्वच प्रमुख उमेदवारांची जोरदार तयारी सुरू झाली आहे. (Bjp) भाजपचे किरण पाटील हे १२ रोजी मोठ्या शक्ती प्रदर्शनाने आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. काल (ता.९) रोजी पाटील यांनी निवडणूक विभागाकडे आपला एक अर्ज दाखल केला आहे. १२ रोजी ते आपला दुसरा अर्ज शक्तीप्रदर्शनाने दाखल करणार आहेत.

Marathwada Teachers constituency News, Aurangabad
Gopichand Padalkar Vs Ajit Pawar: इंदिरा गांधींचा पराभव झाला होता, तिथे अजित पवार किस झाड की पत्ती..

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chadrashekhar Bawankule), केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डाॅ. भागवत कराड, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, सहकार मंत्री अतुल सावे यांच्यासह भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांची देखील यावेळी उपस्थिती असणार आहे. भाजपचे शहर-जिल्हाध्यक्ष शिरीष बोराळकर यांनी ही माहिती दिली. (Marathwada) मराठवाड्यातील भाजपचे सर्वच नेते, राज्य आणि केंद्रातील मंत्री, आमदार, खासदार किरण पाटील यांचा अर्ज दाखल करण्यासाठी उपस्थीत राहणार आहेत.

भाजपने सर्वात आधी किरण पाटील यांच्या उमेदवारीची घोषणा केली होती. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्यातील शिक्षक व पदवीधर मतदारसंघांच्या निवडणुकीसाठी सर्वप्रथम किरण पाटील यांचे मराठवाडा शिक्षक मतदारसंघासाठी नाव जाहीर केले होते. औरंगाबाद आणि लातूर या सर्वाधिक मतदार असलेल्या जिल्ह्यांमध्ये पाटील यांच्या शैक्षणिक संस्था आहेत. या जोरावर भाजपने त्यांना निवडणूक रिंगणात उतरवल्याचे बोलले जाते.

राष्ट्रवादीने या मतदारसंघावर आपली मजबुत पकड कायम ठेवली आहे. विक्रम काळे यांनी हॅट्रीक साधत चौथ्यांदा निवडणुक रिंगणात उडी घेतली आहे. असे असले तरी भाजपच्या किरण पाटलांकडून त्यांना तगडे आव्हान असणार आहे. या शिवाय प्रहार संघटनेने देखील या निवडणुकीत स्वतंत्र उमेदवार दिल्यामुळे त्याचा फटका नेमका कुणाला बसतो हे निकालानंतरच स्पष्ट होईल. पदवीधर निवडणुक लढलेल्या संजय तायडे यांना प्रहारने मैदानात उतरवले आहे. भाजपची मात्र यामुळे डोकेदुखी वाढणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com