लातूर जिल्हा बॅंकेत भाजपचा राडा ; अर्ज बाद झाल्याने विचारला जाब

( Latur District Bank Election) काॅंग्रेसच्या उमेदवारांची थकबाकी असताना त्यांचे अर्ज वैध ठरवले आणि आमच्या नावे बनावट थकबाकी प्रमाणपत्र बनवून अर्ज अवैध ठरवले, असा आरोप कराड यांनी केला.
Bjp Mla Ramesh Karad
Bjp Mla Ramesh KaradSarkarnama
Published on
Updated on

लातूर ः पहिल्यांदाच जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीत संपुर्ण पॅनल उभे करून सत्ताधारी काॅंग्रेसला आव्हान देऊ पाहणाऱ्या भाजपला निवडणुकीआधीच धक्का बसला. अर्ज छाणणी प्रक्रियते भाजपसह काॅंग्रेस बंडखोर व इतर विरोधकांचे अर्ज बाद करण्यात आले होते. हे अर्ज बाद करतांना थकबाकी, सह्या नसणे अशी अनेक कारणे देण्यात आली होती. एकाच दिवशी एका सहीने थकबाकीचे प्रमाणपत्र कसे दिले, रेकाॅर्ड दाखवा, अशी मागणी करत भाजपचे आमदार जिल्हाध्यक्ष रमेश कराड, अरविंद निलंगेकर यांच्या नेतृत्वाखाली भाजपने नुकतीच बॅंकेत धडक दिली.

कार्यकारी संचालकांसह इतर अधिकाऱ्यांना जाब विचारतांना भाजपच्या कार्यकर्त्यांनी बॅंकेत चांगला गोंधळ घातला. संबंधित बॅंकेचे अधिकारी कुठलेही स्पष्टीकरण, रेकाॅर्ड देण्यास तयार नसल्याने कराड यांचा पारा चढला होता. बनवाट प्रमाणपत्र देणारा हरामखोर अधिकारी कोण? असा सवाल करत कराड यांनी तब्बल पाच तास आपल्या कार्यकर्त्यासह बॅंकेत ठिय्या दिला होता. नंतर पोलिसांनी घटनास्थळी धावू घेऊन त्यांची समजूत काढत त्यांना बॅंके बाहेर जाण्यास सांगितले.

दरम्यान, या प्रकारानंतर बॅंकेच्या संचालक मंडळाने देखील ज्यांचा बॅंकेशी संबंध नाही, अशा लोकांनी येवून गोंधळ घातल्या प्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल केली असून संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे. लातूर जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीत भाजपने पॅनल उभे केल्यामुळे रंगत आली होती.

पण सहकार क्षेत्रातील मुरब्बी राजकारणी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या काॅंग्रेसने भाजपला निवडणुकी आधीच चीतपट केले. भाजपसह सर्वच विरोधकांचे अर्ज बाद झाल्यामुळे महाविकास आघाडीच्या सहकार पॅनलचे पाच उमेदवार बिनविरोध निवडून आले. यात काॅंग्रेसचे आमदार धीरज देशमुख, बाबासाहेब पाटील व इतर तिघांचा समावेश आहे.

परंतु यानंतर भाजप विरुध्द काॅंग्रेस असा संघर्ष जिल्ह्यात भडकला आहे. काॅंग्रेस निवडणुकीला घाबरली, त्यांनी लोकशाहीचा खून केला असा आरोप करत भाजपचे माजी मंत्री आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी न्यायालयात धाव घेण्याचा इशारा दिला होता. अर्ज बाद करण्याच्या प्रक्रियेत काॅंग्रेस नेत्यांच्या सांगण्यावरून ज्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी काम केले, बनावट प्रमाणपत्र दिले त्या सर्वांची चौकशी करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करावे, अशी मागणी देखील निलंगेकर यांनी केली होती.

दरम्यान, सोमवारी आमदार रमेश कराड, अरविंद निलंगेकर यांनी थेट जिल्हा बॅंकेचे मुख्यालय गाठत ठिय्या आंदोलन केले. काॅंग्रेसच्या उमेदवारांची थकबाकी असताना त्यांचे अर्ज वैध ठरवले आणि आमच्या नावे बनावट थकबाकी प्रमाणपत्र बनवून अर्ज अवैध ठरवले, असा आरोप करत याचा जाब कराड व इतरांनी बॅंकेचे कार्यकारी संचालक जाधव यांनी विचारला. शिवाय थकबाकीचे रेकाॅर्ड दाखवण्याची मागणी केली.

Bjp Mla Ramesh Karad
भाजपने ईडीची चव घालवली, त्याला बिडी इतकीही किंमत राहिली नाही

यावेळी संबंधित बॅंकेतील अधिकारी मोबाईल बंद करून दालनातून निघून गेल्याचा आरोप देखील भाजपने केला. तर कार्यकारी संचालक जाधव यांनी कुठल्याच प्रश्नाचे समाधानकारक उत्तर दिले नाही. त्यामुळे बॅंकेत तणावाचे वातावरण निर्माण झाले. भाजपचे ठिय्या आंदोलन तब्बल पाच तास चालले. हा वाद आणखी चिघळण्याची शक्यता नाकारता येत नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com