Beed District Politics : भाजपच्या सुरेश धसांची माजी मंत्री क्षीरसागरांच्या कार्यक्रमाला हजेरी; बीडमध्ये नव्या समीकरणाचे संकेत

Suresh Dhas and Jaydatta Kshirsagar : बीडच्या राजकारणात आता नव्या समीकरणाचे संकेत मिळत आहेत.
Suresh Dhas and Jaydatta Kshirsagar
Suresh Dhas and Jaydatta Kshirsagar Sarkarnama
Published on
Updated on

Beed News: भाजप आमदार सुरेश धस यांनी माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या कार्यक्रमाला हजेरी लावली आहे. त्यामुळे बीडच्या राजकारणात आता नव्या समीकरणाचे संकेत मिळत आहेत. बाजार समिती संचालक मंडळाच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी बॅनरवर फोटो छापून देखील आमदार सुरेश धस यांनी पाठ फिरविली होती.

पण आता क्षीरसागर यांच्या अधिपत्याखालील दूध संघाच्या सौर उर्जा प्रकल्पाच्या उद्घाटन कार्यक्रमाला सुरेश धस आवर्जून हजर राहीले आहेत. त्यांची ही उपस्थिती आता राजकीय वर्तुळात चर्चेची ठरत आहे.

राजकारणात कोणीच कोणाचा कायम मित्र वा कायम शत्रु नसतो. याची प्रचिती जयदत्त क्षीरसागर आणि सुरेश धस यांच्यातील राजकीय संबंधावरुन येते. एकेकाळी राष्ट्रवादीत दोघे असताना ते एकमेकांचे राजकीय विरोधक होते.

अगदी जयदत्त क्षीरसागर पालकमंत्री असताना त्यांच्याच घरात बसून सुरेश धस यांनी राजकीय डावपेच खेळत क्षीरसागरांच्या पुतणे संदीप क्षीरसागरांऐवजी आपले समर्थक सय्यद अब्दुल्ला यांच्या गळ्यात जिल्हा परिषद अध्यक्षपदाची माळ चढविली होती.

Suresh Dhas and Jaydatta Kshirsagar
Jayant Patil on Loksabha : लोकसभेसाठी राष्ट्रवादीचा प्लॅन ठरला; बारामतीत ताई, जळगाव अन् साताऱ्याबाबत जयंत पाटलांचं मोठं भाष्य

मागच्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत सुरेश धस भाजपकडून लढले. त्यावेळी जयदत्त क्षीरसागर राष्ट्रवादीत असूनही त्यांची भूमिका धसांना अनुकुल होती. दरम्यान, विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर राजकीय समिकरणे झपाट्याने बदलली.

शिवसेनेने जयदत्त क्षीरसागर यांना पक्षातून काढल्यानंतर त्यांच्या भाजप एट्रीच्या प्रयत्नाला भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांचा विरोध असल्याचे बोलले जात आहे. पण आता याच भाजपचे आमदार सुरेश धस यांनी जयदत्त क्षीरसागर यांच्या व्यासपीठावर हजेरी लावल्याने बीडच्या राजकारणात नव्या समीकरणाचे संकेत मिळत आहेत.

काही महिन्यांपूर्वी झालेल्या बाजार समितीच्या निवडणुकीवेळी जयदत्त क्षीरसागर यांनी प्रचारासाठी सुरेश धस यांना निमंत्रीत केले होते. पण स्थानिक भाजपच्या विरोधामुळे ऐनवेळी धस यांनी येणे टाळले होते.

मात्र, अलिकडे जयदत्त क्षीरसागर यांच्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अनुकुल असल्याची माहिती आहे. जयदत्त क्षीरसागर हे तौलिक साहू महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष असून नागपूर भागात हा घटक परिणामकारक आहे. त्यामुळे जयदत्त क्षीरसागरांना भविष्यात भाजपचे दार उघडू शकते, असे मानले जाते.

आता रविवारी जयदत्त क्षीरसागर यांच्या अधिपत्याखालील बीड तालुका दूध व्यावसायिक सहकारी संस्थांच्या संघातर्फे सौर उर्जा प्रकल्पाचे उद॒घाटन झाले. या कार्यक्रमाला सुरेश धस यांनी आवर्जुन हजेरी लावली. काही महिन्यांपूर्वी क्षीरसागरांना टाळणाऱ्या भाजपच्या धसांनी आता लावलेली हजेरी संभाव्य राजकीय समिकरणाची नांदी ठरणार का ? हे पाहणे महत्वाचे असणार आहे.

Edited By- Ganesh Thombare

Suresh Dhas and Jaydatta Kshirsagar
Praful Patel News : शरद पवारांसोबतच्या फोटोवर अखेर पटेलांचा खुलासा : म्हणाले...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com