MVA News : मराठवाड्यात भाजपचं टेन्शन वाढलं; निवडणुकीच्या तोंडावर माजी महिला आमदाराने घेतला मोठा निर्णय

Political News : अनेक बंडखोरांनी तलवार म्यान करण्यात पक्षाला यश आले. मात्र, काही इच्छुकांनी अखेरपर्यंत बंडखोरी कायम ठेवली. त्यामुळे महायुती व महाविकास आघाडीच्या अडचणीत वाढ झाली.
Sangeeta Thombre, Bajrang Sonvane
Sangeeta Thombre, Bajrang Sonvane Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : राज्यातील विधानसभा निवडणुकीची धामधुमी जोरात सुरु आहे. विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी व महायुती समोरासमोर आली आहे. त्यामध्ये राज्यातील लढतीचे चित्र स्पष्ट झाल्यानंतर बहुतांश मतदारसंघात बंडखोरी झाल्याचे दिसून येते. त्यामुळे एकीकडे बंडखोर उमेदवारांची मनधरणी करण्यात येत असतानाच केजच्या माजी आमदार संगीता ठोंबरे यांनी भाजपला रामराम करीत खासदार बजरंग सोनवणेंच्या उपस्थित त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश केला.

महायुती व महाविकास आघाडीतील जागावाटपात यावेळेस मोठा ट्विस्ट पाहायला मिळाला. वरिष्ठ नेत्यांकडून नाराजांची समजूत काढण्याचे शेवटपर्यंत प्रयत्न झाले. अनेक बंडखोरांनी तलवार म्यान करण्यात पक्षाला यश आले. मात्र, काही इच्छुकांनी अखेरपर्यंत बंडखोरी कायम ठेवली. त्यामुळे महायुती व महाविकास आघाडीच्या अडचणीत वाढ झाली.

बीड जिल्ह्यातील केज विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या माजी आमदार संगीता ठोंबरे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यामुळे महायुतीचे टेन्शन वाढले होते. विशेषतः या मतदारसंघातील भाजप महायुतीच्या उमेदवार नमिता मुंदडा यांची डोकेदुखी वाढली होती. त्यातच माजी आमदार संगीता ठोंबरे (Sangeeta Thombare) यांनी थेट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करत हाती तुतारी घेतली आहे. त्यामुळे येत्या काळात महायुतीसमोरील अडचणीत भर पडली आहे.

केज विधानसभा मतदारसंघातून विद्यमान आमदार नमिता मुंदडा यांना भाजपकडून पुन्हा उमेदवारी देण्यात आली. त्यानंतर भाजपच्या माजी आमदार संगीता ठोंबरे यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र, उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी संगीता ठोंबरे यांनी केज विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज मागे घेतला.

Sangeeta Thombre, Bajrang Sonvane
Beed News: प्रचारादरम्यान माजी आमदार विसरले स्वत:चे चिन्ह; दुसऱ्यालाच मतदान करण्याचे केले आवाहन

त्यानंतर संगीता ठोंबरे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज मागे घेत राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) शरदचंद्र पवार पक्षाला पाठिंबा दिला. त्यामुळे संगीता ठोंबरे यांनी थेट भाजपला आव्हान दिले आहे. त्यानंतर, गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार बजरंग सोनवणे यांच्या उपस्थितीत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्या पक्षात प्रवेश केला. स्वत: बजरंग सोनवणे यांनी ट्विट करुन याबाबतची माहिती दिली.

भाजपच्या ज्येष्ठ नेत्या आणि केज विधानसभेच्या माजी आमदार संगीता ठोंबरे यांनी बजरंग सोनवणे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. त्यांच्या प्रवेशाने पक्षाचे बळ निश्चितपणे वाढेल, असा विश्वास यावेळी बजरंग सोनवणे यांनी व्यक्त केला. दरम्यान, केज मतदारसंघातून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार पृथ्वीराज साठे यांना महाविकास आघाडीची उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे येत्या काळात केज मतदारसंघातील चित्र बदलणार आहे.

Sangeeta Thombre, Bajrang Sonvane
Shivsena News : सदाभाऊ व्हाया जालंदर पाटील शिवसेनेत; शेट्टींचा मोहरा एकनाथ शिंदेंनी उचलला

दरम्यान, 2014 च्या विधानसभा निवडणुकीत संगीता ठोंबरे यांनी केज विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवून विजयी झाल्या होत्या. परंतु 2019 मध्ये त्यांना भाजपने उमेदवारी नाकारत नमिता मुंदडा यांना उमेदवारी दिली होती. आता पुन्हा या निवडणुकीत उमेदवारी नाकारल्याने संगीता ठोंबरे यांनी शरद पवारांची भेट घेतली होती. त्यानंतर त्यांनी उमेदवारी मागे घेत शरद पवार पक्षात प्रवेश केला.

ऐनवेळी केला होता भाजपमध्ये प्रवेश

2019 च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने नमिता मुंदडा यांना पहिल्यांदा उमेदवारी जाहीर केली होती. जाहीर केलेली उमेदवारी सोडून ऐन निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेससोडून भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यावेळी भाजपने नमिता मुंदडा यांना उमेदवारी दिली होती. त्या ठिकाणी आमदार म्हणून त्या निवडूनही आल्या होत्या. यावेळेस भाजपकडून त्या दुसऱ्यांदा निवडणूक रिंगणात उतरल्या आहेत.

Sangeeta Thombre, Bajrang Sonvane
Mahayuti News : दादांचं ठरलं ! शिवतारेंना पाडायचंच.. पुरंदर विधानसभा मतदारसंघात मैत्रीपूर्ण लढत

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com