Shivsena News : सदाभाऊ व्हाया जालंदर पाटील शिवसेनेत; शेट्टींचा मोहरा एकनाथ शिंदेंनी उचलला

Political News : जालिंदर पाटील यांच्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेला धक्का मिळाला असून अभ्यासू नेतृत्व असलेला घटनेचा मावळा मुख्यमंत्री शिंदेंनी हेरला आहे.
Eknath Shinde, Ajit Pawar
Eknath Shinde, Ajit Pawar Sarkarnama
Published on
Updated on

KolhaPur News : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे गळती सत्र सुरूच आहे. सातत्याने बदलत्या भूमिकेमुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेतील प्रमुख पदाधिकारी नाराज असल्याने माजी खासदार राजू शेट्टी यांच्यासोबत फारकत घेण्याचे सत्र सुरू आहे. अशातच प्रदेशाध्यक्ष जालंदर पाटील यांनी देखील शेट्टी यांच्याबद्दल त्या राजकीय भूमिकेवर नाराजी दाखवली होती. त्यासंदर्भात सरकारनामाने पहिल्यांदा प्रदेशाध्यक्षांचा स्वाभिमान दुखावला या मथळ्याखाली बातमी दिली होती.

मंगळवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत स्वाभिमानीचे प्रदेशाध्यक्ष जालिंदर पाटील यांनी शिवसेनेत प्रवेश केला. रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष आमदार सदाभाऊ खोत व्हाया जालिंदर पाटील हे शिवसेनेत (Shivsena) दाखल झाले आहेत. जालिंदर पाटील यांच्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेला धक्का मिळाला असून अभ्यासू नेतृत्व असलेला घटनेचा मावळा मुख्यमंत्री शिंदेंनी हेरला आहे.

लोकसभा निवडणुकीत एकला चलोची भूमिका घेतल्यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी (Raju Shetti) यांना पराभवाला सामोरे जावे लागले. त्यानंतर कार्यकर्त्यांचे गटबंधन करण्यासाठी राज्यभर दौरे करत राजू शेट्टी यांच्याकडून प्रयत्न करण्यात आला. अशातच विधानसभा निवडणुकीत परिवर्तन महाशक्ती ही तिसरी आघाडी केली. मात्र लोकसभा निवडणुकीत झालेले सलग दोन पराभव, चळवळ येथील प्रमुख आणि खांद्या पदाधिकाऱ्यांचे होत असलेले खच्चीकरण त्यामुळे अनेकांनी नाराजी व्यक्त केली होती.

दरम्यान 23 व्या ऊस परिषदेला संघटनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनीच दांडी मारली होती. महत्त्वाचे पदाधिकारी राजू शेट्टी यांच्या राजकीय भूमिकेवर नाराज होते. संघटनेचे नेते प्रदेशाध्यक्ष जालिंदर पाटील यांनी वेगवेगळी कारणे देत ऊस परिषदेलाच दांडी मारली होती.

Eknath Shinde, Ajit Pawar
Sharad Pawar : राहुल गांधी, उद्धव ठाकरे यांच्यासमोरच शरद पवारांची 'ही' मोठी घोषणा

विधानसभा निवडणुकीला देखील प्रमुख पदाधिकारी यांनी एकतर महाविकास आघाडीसोबत चला किंवा महायुतीसोबत चला. अशी भूमिका शेट्टी यांच्यासमोर मांडली होती. मात्र, वारंवार स्वतःची भूमिका तीच संघटनेची भूमिका, घेत असल्याचा आरोप प्रमुख पदाधिकाऱ्यांकडून शेट्टी यांच्यावर केला जात आहे. यावेळी देखील तिसरी आघाडी स्थापन करण्यासाठी परिवर्तन महाशक्ती आघाडी तयार करण्यात आली.

यामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा प्रमुख सहभाग आहे. सातत्याने बदलणाऱ्या भूमिकेमुळे पक्षातील प्रमुखच नाराज आहेत. प्रदेशाध्यक्ष जालिंदर पाटील हे देखील शेट्टी यांच्या राजकीय भूमिकेच्या विरोधात होते.

Eknath Shinde, Ajit Pawar
Uddhva Thackeray News : उद्धव ठाकरे यांच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com