Ambadas Danve On Aurangzeb Poster: हिंदुत्वाचे ढोल बडवणाऱ्या सरकारला औरंगजेबाचे पोस्टर दिसत नाहीत का ?

Aurangzeb Poster News: फाजील गप्पा मारून, आम्ही हिंदुत्ववादी म्हणून होणार नाही.
Ambadas Danve- CM Eknath Shinde News
Ambadas Danve- CM Eknath Shinde NewsSarkarnama

Shivsena : औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर असे नामांतर झाल्यानंतर या विरोधात शहरात बेदमूदत उपोषण करण्यात आले. (Ambadas Danve On Aurangjeb Poster) यावेळी आंदोलकांनी औरंगजेबाचे पोस्टर झळकवत घोषणाबाजी केली होती. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अहमदनगरचे नामांतर अहिल्यानगर करण्याची घोषणा केली. त्यानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये घडला तसाच प्रकार नगरमध्येही घडला.

Ambadas Danve- CM Eknath Shinde News
Sharad Pawar News : शिवछत्रपतींनी भोसल्यांचं राज्य केलं नाही तर हिंदवी स्वराज्य.. ; शरद पवारांची भावना !

एका मिरवणूकीत मुस्लिम तरुणांनी औरंगजेबाचे पोस्टर झळकवत घोषणबाजी केली. या प्रकरणी चार तरुणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असला तरी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. (Shivsena) हिंदुत्ववादाचे ढोल बडवणाऱ्या विद्यमान सरकारला औरंगजेबाचे झळकवलेले पोस्टर नजरेस पडले नाही का? असा संतप्त सवाल त्यांनी ट्विटच्या माध्यमातून केला आहे.

दानवे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, नगरमध्ये पुन्हा एकदा औरंगजेबाचे पोस्टर नाचवण्यात आले आहेत. (Eknath Shinde) हिंदुत्वाचे ढोल बडवणाऱ्या विद्यमान सरकारच्या नजरेस हे पडत नाही का? संभाजीनगरात या अगोदर हे झाले, तेव्हा कारवाई शून्य होती. (Marathwada)

आताही तेच हे सरकार करणार? फाजील गप्पा मारून, आम्ही हिंदुत्ववादी म्हणून होणार नाही. नगरमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयापुढे एका माता-पित्याला 'लव्ह जिहाद'च्या कारणाने उपोषणास बसावे लागले आहे, हे वाईट आहे! अशा शब्दांत दानवे यांनी सरकारवर निशाणा साधला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com