Sugar Factory News : गंगापूरचा बंद कारखाना सुरू करण्याचे दोन्ही पॅनलचे आश्वासन, उद्या मतदान..

Mla Prashant Bamb : आमदार प्रशांत बंब व ठाकरे गटाची या निमित्ताने प्रतिष्ठापणाला लागली आहे.
Gangapur Sugar Factory Election News, Aurangabad
Gangapur Sugar Factory Election News, AurangabadSarkarnama
Published on
Updated on

Aurangabad : गेल्या पंधरा वर्षापासून बंद असलेला आणि बॅंकेने कर्जवसुलीसाठी भाडे तत्वावर चालवण्यासाठी दिलेल्या गंगापूर सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळासाठी उद्या (ता.१२) रोजी मतदान होत आहे. गंगापूर-खुल्ताबादचे भाजप आमदार प्रशांत बंब (Prashant Bamb) आणि ठाकरे गटाचे माजी चेअरमन कृष्णापाटील डोणगांवकर यांच्या पॅनलमध्ये थेट लढत होत आहे.

Gangapur Sugar Factory Election News, Aurangabad
Ajit Pawar : भुमरेंच्या दारू दुकानांचा अजित पवारांकडूनही उल्लेख, म्हणाले एकनाथ महाराजांना काय वाटेल ?

विशेष म्हणजे दोन्ही पॅनलकडून कारखाना (bjp) वाचवण्यासाठी आणि तो सुरु करण्यासाठी मत मागितली जात आहेत. (Aurangabad) आता कारखान्याचे सभासद नेमका कुणावर विश्वास ठेवतात हे १३ फेब्रुवारीच्या मतमोजणीनंतर स्पष्ट होणार आहे.

प्रशांत बंब यांच्या मतदारसंघातील हा कारखाना असून आरोप-प्रत्यारोप आणि अपहार प्रकरणी दाखल झालेले गुन्हे यामुळे तो राज्यभरात चर्चेत आला होता. बंब यांनी विरोधी पॅनलच्या उमेदवारांवर त्यांच्या डोळा कारखान्याची जमीन आणि तिथल्या भंगारावर असल्याचा आरोप प्रचारा दरम्यान केला होता.

तर शिवशाही सहकार पॅनलच्या कृष्णापाटील डोणगांवकर यांनी बंब यांच्यावर कारखाना बुडवल्याचा आरोप करत तो वाचवण्यासाठी आम्हाला मत द्या, असे आवाहन केले आहे. २१ संचालक मंडळापैकी एक संचालकाची निवड याआधीच बिनविरोध झाली आहे. तर उर्वरित २० संचालकासाठी उद्या, (ता.१२) सकाळी ८ वाजेपासून मतदानाला सुरूवात होणार आहे.

आमदार प्रशांत बंब व ठाकरे गटाची या निमित्ताने प्रतिष्ठापणाला लागली आहे. २० जागांसाठी ४० उमेदवार रिंगणात असून सोसायटी मतदारसंघातून माजी नगराध्यक्ष संजय जाधव बिनविरोध निवडून आले आहेत. २००८ पासून गंगापूर कारखाना बंद आहे.

Gangapur Sugar Factory Election News, Aurangabad
Ajit Pawar News : नऊ महिन्यात बाळ जन्माला येतं, यांना मंत्रीमंडळ विस्तार करता येईना..

तत्कालीन संचालक मंडळावर १५ कोटी ७५ लाख रुपयांचा अपहार केल्या प्रकरणी आमदार प्रशांत बंब, प्रभारी कार्यकारी संचालकांसह १६ जणांविरोधात गंगापूर पोलिस ठाण्यात १८ नोव्हेंबर २०२१ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता.

माजी चेअरमन कृष्णापाटील डोणगावकर यांनी संचालक मंडळावर अपहाराचे आरोप करत पोलिसांत तक्रार दाखल केली होती. तेव्हापासून गंगापूर सहकारी साखर कारखाना राज्यभरात चर्चेत आला होता. आता हाच कारखाना पुन्हा सुरू करण्याचे आश्वासन बंब आणि डोणगावकर यांच्या पॅनलने दिले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com