Ambadas Danve News : `समृद्धी`वरील वेगाला ब्रेक ! दानवे म्हणतात, मग महामार्गावरून प्रवास का करावा ?

Samrudhi Highway News : आतापर्यंत या मार्गावर साधारण ३५०० अपघात झाले (सप्टेंबर २०२३). पैकी २००० अपघात हे वाहनातील तांत्रिक बिघाडामुळे झाले.
Ambadas Danve News
Ambadas Danve NewsSarkarnama
Published on
Updated on

Shivsena News : राज्याच्या विकासात माईल स्टोन ठरणाऱ्या समृद्धी महामार्गावर होणारे अपघात टाळण्यासाठी राज्य सरकारने वेग मर्यादेवर बंधन आणण्याचे ठरवले आहे. (Samrudhi Highway News) नव्या नियमानूसार समृद्धीवरून धावणाऱ्या वाहनांची वेग मर्यादा आता १२० किमी प्रतितास वरून १०० इतकी करण्यात येणार आहे. सरकारच्या पाहणीनुसार अतिवेगामुळेच समृद्धी महामार्गावरील अपघात वाढल्याचे समोर आले होते. त्यानंतर हा निर्णय घेण्याचा विचार सरकार करत आहे.

Ambadas Danve News
PM Modi Shirdi Visit : यहाँ के कर्मठ मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंजी... असा उल्लेख पंतप्रधान मोदींनी का केला?

मात्र, सरकारच्या या निर्णयावर (Shivsena) शिवसेना ठाकरे गटाने टीका केली आहे. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी ताशी ८० ते १०० किलोमीटर प्रतितास वेगाने वाहने चालवायची असतील, तर मग अवाढव्य टोल देऊन समृद्धी महामार्गावरून प्रवास का करावा? असा प्रश्न उपस्थितीत केला आहे. (Marathwada) या संदर्भात दानवे यांनी संतप्त प्रतिक्रिया देत सरकारने या निर्णयाचा शंभर वेळा विचार करावा, असा टोलाही लगावला आहे.

महाराष्ट्र सरकार हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गावरील चारचाकी वाहनांचा कमाल वेग १२० किमी प्रतितास वरून १०० किमी प्रतितासावर आणण्याच्या बेतात आहे. (Maharashtra) आतापर्यंत या मार्गावर ४९ लाख वाहनांनी प्रवास केला आहे. हा प्रवास त्यांनी वेळ वाचवण्याच्या साध्या कारणासाठी केला आहे. आतापर्यंत या मार्गावर साधारण ३५०० अपघात झाले (सप्टेंबर २०२३). पैकी २००० अपघात हे वाहनातील तांत्रिक बिघाडामुळे झाले असल्याचे समोर आले आहे.

मग १५०० वाहनांतील चालकांच्या चुकीमुळे या महामार्गावरून जबाबदारीने जाणाऱ्या लाखो वाहनांना शिक्षा देण्याचे सरकारचे धोरण अजबच आहे. गती कमी करणे हा महामार्गाच्या निर्मितीच्या मूळ उद्देशाला हरताळ फासण्याचे काम ठरेल. ८०-१०० किमी प्रतितास वेगाने जायचे झाले तर किलोमीटरमागे १.७३ रुपये प्रतिकिलोमीटर एवढा टोल देऊन लोक या महामार्गातून का प्रवास करतील? टोलविरहित रस्ता त्यांना कधीही सोयीचा ठरतो.

मोठ्या वाहनांच्या वेगावर निर्बंध आले, तर एक वेळ समजू शकतो. बेफाम गाडी चालवणाऱ्यांचे वर्ग घेतले जाऊ शकतात, पण लहान वाहनांवर असले निर्बंध समृद्धी एक्स्प्रेस वेचा प्रकल्प तोट्यात नेईल. शिवाय मुंबई-नागपूर प्रवासाचा वेळ कमी करण्याच्या मूळ उद्देशाला तडा जाईल. हे असले फाजील निर्णय घेण्यापूर्वी सरकारने एक-दोन नव्हे तर १०० वेळेस विचार करायला हवा!, असा चिमटाही दानवे यांनी काढला आहे.

Edited By : Jagdish Pansare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com