PM Modi Shirdi Visit : यहाँ के कर्मठ मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंजी... असा उल्लेख पंतप्रधान मोदींनी का केला?

Modi in Shirdi: पंतप्रधान मोदी यांनी ह.भ.प. बाबा महाराज सातारकर यांना श्रद्धांजली अर्पण केली.
Narendra Modi, Eknath Shinde
Narendra Modi, Eknath ShindeSarkarnama
Published on
Updated on

PM Modi Maharashtra Tour: शिर्डी ः छत्रपती शिवरायांना त्रिवार नमस्कार, अशी मराठीतून सुरुवात करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिर्डीतील हजारो नागरिकांची मने जिंकली. पंतप्रधान मोदी यांनी या वेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा उल्लेख कर्मठ (चांगल्या पद्धतीने काम करणारा) मुख्यमंत्री असा केला. पंतप्रधान मोदी यांनी सभेसाठी आलेल्या नागरिकांचा उल्लेख 'माझे कुटुंबीय' असा करत पुन्हा एकदा त्यांनी मराठीतून 'शिर्डीच्या या पावनभूमीला माझे कोटी कोटी नमन' असे म्हटले. विविध विकासकामांच्या लोकापर्णासाठी पंतप्रधान मोदी हे शिर्डी (जि. अहमदनगर) येथे आले होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Narendra Modi, Eknath Shinde
PM Narendra Modi in Shirdi : पंतप्रधान मोदी पाच वर्षांनंतर शिर्डीत ; पाहा खास फोटो !

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ह.भ.प. बाबा महाराज सातारकर यांना श्रद्धांजली वाहिली. बाबा महाराज सातारकर यांचे गुरुवारी निधन झाले. त्यांचा उल्लेख त्यांनी आपल्या भाषणाच्या सुरुवातीलाच केला. ते म्हणाले, बाबा महाराज सातारकरांनी कीर्तनातून समाज जागरणाचे काम केले. त्यांची बोलण्याची पद्धत अत्यंत साधी होती. त्यांच्या प्रेमपूर्वक वाणीमुळे लोक त्यांच्याकडे आकर्षित होत. त्यांच्या वाणीत नेहमी 'जय जय रामकृष्ण हरी'चा जयघोष असत. बाबा महाराज सातारकर यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.

तत्पूर्वी त्यांनी शिर्डीच्या या पावनभूमीला माझे कोटी कोटी नमन. या पवित्र मंदिराला पाच वर्षांपूर्वी १०० वर्षे झाले होते. तेव्हा मला साई दर्शनाची संधी मिळाली होती. आज पुन्हा मी इथे आलो आहे. साईबाबांच्या आशीर्वादामुळे इथे साडेसात हजार कोटी रुपये खर्चाच्या निधीचे काम सुरू करता आले. येथील ज्या योजनांचे आज लोकार्पण झाले आहे, त्याचा शिलान्यास करण्याची संधीही मला मिळाली आहे, असे ते म्हणाले.

दरम्यान, पंतप्रधान मोदींचा सत्कार करताना सर्वप्रथम त्यांना महाराष्ट्राचा पारंपरिक पैठणीचा फेटा बांधला गेला. यानंतर शाल, पुष्पगुच्छ, साईबाबांची मूर्ती, श्रीराम व सीतेची मूर्ती, मंगलकलश देण्यात आला. याशिवाय 'मेरी माटी मेरा देश' या उपक्रमांतर्गत अहमदनगर जिल्ह्यातील सर्व गावांची माती ठेवलेला आणखी एक मंगल कलश महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिला. यानंतर पंतप्रधान मोदींना भगवान विष्णूचे दहा अवतार चितारलेली एक खास तलवारही भेट स्वरूपात देण्यात आली.

पंतप्रधान मोदी यांनी केंद्र सरकारच्या योजनांविषयी माहिती देताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार आणि तत्कालीन यूपीए सरकारवर टीका केली. मी विकासाचे आकडे सांगतो, पण २०१४ च्या आधी केवळ भ्रष्टाचाराचे आकडे समोर यायचे, असा टोलाही त्यांनी या वेळी लगावला.

Narendra Modi, Eknath Shinde
Narendra Modi Shirdi Visit : पायाभरणी ते लोकार्पण, मोदींचा दुसरा दौरा चर्चेत

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com