Shivraj Bangar Resigns: शिवराज बांगरांची सहा महिन्यातच बीआरएसला सोडचिठ्ठी; BRS ही भाजपची बी टीम..

Shivraj Bangar BRS News: धाराशीव मधील काही पदाधिकारीही बीआरएसला सोडचिट्टी देण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे.
Shivraj Bangar
Shivraj BangarSarkarnama
Published on
Updated on

Beed BRS News: सहा महिन्यापूर्वी मोठा गाजावाजा करीत बीआरएसमध्ये (BRS) प्रवेश केलेले बीआरएसचे समन्वयक शिवराज बांगर यांनी बीआरएसवर गंभीर आरोप करीत पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. राजीनामा देण्यापूर्वी बांगर यांनी "बीआरएस ही भाजपची बी टीम आहे. महाराष्ट्रात प्रवेश घेण्यासाठी त्यांनी आठ दलाल नेमले आहेत," असा गंभीर आरोप केला आहे.

"काही दिवसाचा अनुभव आल्यानंतर आमचा भ्रमनिरास झाला.महाराष्ट्रातील जनतेवर ही वेळ येऊ नये, म्हणून आम्ही वेळीच सर्वांना सावध करणार आहोत," असेही बांगर म्हणाले. शिवराज बांगरांच्या राजीनाम्यानंतर आता धाराशीव मधील काही पदाधिकारीही बीआरएसला सोडचिट्टी देण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे.

Shivraj Bangar
Shinde Group Vs BJP : शिंदे गट-भाजप कार्यकर्त्यांमध्ये राडा ; भाजपचे चिन्ह रंगवण्याचे काम सुरू असताना वाद ..

"बीआरएसने राष्ट्रवादी काँग्रेस,शिवसेना आणि काँग्रेसमधील अस्वस्थ मंडळींना गळ घालण्यासाठी काही एजंट नेमले आहेत. हे एजंट आर्थिक आणि राजकीय आमीष दाखवून त्यांचे प्रवेश घडवून आणत आहेत. प्रवेश देताना वेगळी भूमिका आणि प्रवेश दिल्यानंतर वेगळी भूमिका असे बीआरएसचे धोरण आहे," अशी पोलखोल बांगरांनी केली आहे.

Shivraj Bangar
Raj Thackeray Live Panvel : आता `मनसे`चे अमराठी पदाधिकारी पक्षाला अमराठींची साथ आणि मत मिळवून देणार ?

सहा महिन्यापूर्वी बांगर यांनी बीआरएसमध्ये प्रवेश केला होता. त्यापूर्वी ते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत ऊसतोड मजूर सेलचे प्रदेशाध्यक्ष होते. तेव्हा मनसेला मराठवाड्यातून मोठा धक्का बसला होता. आता बांगरांनी बीआरएसला सोडचिठ्ठी दिल्यानंतर त्यांचे समर्थकही राजीनामा देणार असल्याची माहिती आहे.

बांगरांचा राजकीय प्रवास..

शिवराज बांगर हे शिवसेनेत होते. त्यांनी वंचित बहुजन आघाडीत प्रवेश घेतला होता. वंचितमध्ये एकोपा आणि एकनिष्ठता नसल्याचा आरोप करीत बांगर त्या ठिकाणी फार काळ टिकले नाहीत. त्यानंतर त्यांनी मनसेमध्ये प्रवेश केला होता. मनसेतून ते ठाकरे गटात जाण्यासाठी इच्छुक होते. याबाबतची त्यांची वरिष्ठांची बोलणीही सुरू होती. पण अंतर्गत गटबाजीमुळे त्यांना प्रवेश नाकारण्यात आला होता. त्यानंतर बांगर हे बीआरएसमध्ये दाखल झाले होते. बीआरएसला सोडचिठ्ठी दिल्यानंतर ते आता कुठल्या पक्षात जाणार हे लवकरच समजेल.

Edited By : Mangesh Mahale

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com