Kalyan News : राज्यात शिंदे गट- भाजपची सत्ता असली तरी त्यांच्यातील वाद आता चव्हाट्यावर येऊ लागले आहेत. कल्याणमध्ये शिंदे गट आणि भाजपचे कार्यकर्ते आमनेसामने आले. कल्याण चक्की नाका टेकडी परिसरातील ही घटना घडली.
भाजप कार्यकर्त्यांकडून भिंतीवर भाजपचे चिन्ह रंगवण्याचे काम सुरू असताना हा वाद झाला. भाजप कार्यकर्त्यांना शिंदे गटाच्या नगरसेवकाच्या समर्थकांनी विरोध करत मारहाण केली. त्याला भाजप कार्यकर्त्यांनी प्रत्युत्तर दिले. भाजपचे कल्याण पूर्व शहर अध्यक्ष संजय मोरे यांनी 'आपल्या नगरसेवकांना आवरा अन्यथा आम्ही हात सोडू,असा इशारा शिवसेना शिंदे गटाला दिला आहे.
भाजप शहराध्यक्ष कार्यकर्ते कोळशेवाडी पोलीस ठाण्यात दाखल झाले होते. भाजप कार्यकर्त्यांकडून कल्याण चक्की नाका टेकडी परिसरात भिंतीवर भाजप चिन्हाचे चित्र रंगवण्याचे काम सुरू होते. यावेळी शिंदे गटाचे नगरसेवक मल्लेश शेट्टी यांचे समर्थक त्या ठिकाणी आले. त्यांनी भाजप कार्यकर्त्यांना विरोध करत तीन ते चार कार्यकर्त्यांना लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण केली.
मल्लेश शेट्टी यांच्या सांगण्यावरूनच भाजप कार्यकर्त्याना मारहाण झाल्याचा आरोप भाजप शहराध्यक्ष संजय मोरे यांनी केला आहे.कल्याणमधील या वादावरून भाजप-शिंदे गटात सारे काही आलबेल नाही, हे स्पष्ट झाले आहे. या वाद आता पश्रश्रेष्ठींकडे जाणार असल्याचे समजते.
राज्यात शिंदे-फडणवीसांचे सरकार स्थापन झाल्यानंतर वरिष्ठ स्तरावर सारे काही सुरळीत सुरु असताना तळागाळातील कार्यकर्त्यांमध्ये वाद होत आहे. भाजप पदाधिकाऱ्यांची शिंदे गटाकडून अडवणूक होत असल्याने भाजप नेते, पदाधिकारी नाराज होते. कल्याण लोकसभा मतदार संघात देखील भाजप आणि शिंदे गटातील वाद अनेक घटनांमधून समोर आला आहे.
भाजप नेत्यांनी यापूर्वी देखील अनेक कार्यक्रमांत उघड उघड शिंदे गटास सहकार्य तसेच तळागाळातील कार्यकर्त्यांची समजूत काढण्यास सांगण्यात येत होते. परंतू त्यास शिंदे गट फारसा प्रतिसाद देताना दिसत नाही. कल्याण पूर्वेचे आमदार गणपत गायकवाड यांनी स्वतः ग्रामीण भागातील एका कार्यक्रम प्रसंगी मंचावर शिंदे गटाचे खासदार शिंदे यांच्याकडे ही खंत बोलून दाखवली होती. त्यानंतरही कल्याण पूर्वेत भाजप व शिंदे गटात कुरबुरी या सुरुच आहेत.
Edited By : Mangesh Mahale
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.